वाहतूक नियंत्रण अधिसूचना......

पालघर जिल्ह्याच्या प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यांवरील (CZMP) अनुषंगाने जनसुनावणी घेण्यात येणार आहे...

वाहतूक नियंत्रण अधिसूचना......
Traffic control notification

वाहतूक नियंत्रण अधिसूचना

ज्याअर्थी उपोद्घातातील अ.क्र.१ वर अंतर्भुत असलेल्या पत्रान्वये पालघर पोलीस ठाण्याचे हद्दीत दिनांक ३०/०९/२०२० ते दि.०१/१०/२०२० रोजी पावेतो मा.जिल्हादंडाधिकारी पालघर यांनी दांडेकर कॉलेज, खारेकुरण रोड, पालघर या ठिकाणी पालघर जिल्ह्याच्या प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यांवरील (CZMP) अनुषंगाने जनसुनावणी घेण्यात येणार आहे. सदर पालघर जिल्ह्याच्या प्रारुप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यांवरील (CZMPs) ला स्थानिक मच्छिमार तसेच इतरांचा विरोध असल्याने सदर जनसुनावणीस मोठ्या प्रमाणात जन समुदाय उपस्थित राहुन गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करीता पालघर खारेकुरण रोड वरील वाहतुक बंद करणेकामी वाहतुक अधिसूचना निर्गमित होणेस विनंती केलेली आहे.

त्याअर्थी मी डॉ.किरण महाजन, अपर जिल्हादंडाधिकारी पालघर मला उपोदघातातील अ.क्र.३ व ४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन खालील प्रमाणे वाहतुक नियंत्रण अधिसूचना जारी करीत आहे.

पर्यायी मार्ग :

१. पालघर-बोईसर कडून खारेकुरणकडे जाणारी वाहतुक गोठणपूर नाका- चार रस्ता-डॉ.आंबेडकर चौक टेंभोडे चाफेकर कॉलेज मार्गे खारेकुरण.

२. खारेकुरण गांवाकडून येणारी वाहतुक खारेकुरण-चाफेकर कॉलेज रोड, टेंभोडे-डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्ग

पालघर शहर :

उपरोक्त मार्गावर बुधवार दिनांक ३०/०९/२०२० रोजी सकाळी ०८.०० वा ते जनसुनावणीची प्रक्रिया संपे पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांस प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदरची वाहतुक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने, महसूल विभागाची वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने, पोलिसांनी परवानगी दिलेली वाहने, उपविभागीय दंडाधिकारी व तालुका दंडाधिकारी यांनी परवानगी दिलेली वाहने तसेच जनसुनावणी आयोजकांच्या वाहनांना लागू राहणार नाही. सदरची बाहतुक नियंत्रण अधिसूचना बुधवार दिनांक ३०/०९/२०२० रोजी सकाळी ०८.०० वा ते जनसुनावणीची प्रक्रिया संपे पर्यत अंमलात राहील.

सफाळे पालघर 
प्रतिनिधी - रवींद्र घरत 

_________

Also see : १२६ निरंकारी भक्तांनी केले रक्तदान

https://www.theganimikava.com/126-Nirankari-devotees-donated-blood