ठाणे जिल्हा परिषद क्षेत्रात मोहीम यशस्वी करण्यासाठी उत्तम अंमलबजावणी करण्याचे निर्देश

ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरू असून ही मोहीम यशस्वीरित्या राबवण्यासाठी उत्तम अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रूपाली सातपुते यांनी दिले...

ठाणे जिल्हा परिषद क्षेत्रात मोहीम यशस्वी करण्यासाठी उत्तम अंमलबजावणी करण्याचे निर्देश
To implement the campaign successfully in Thane Zilla Parishad area

ठाणे जिल्हा परिषद क्षेत्रात मोहीम यशस्वी करण्यासाठी उत्तम अंमलबजावणी करण्याचे निर्देश

 ठाणे (thane)  : ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरू असून ही मोहीम यशस्वीरित्या राबवण्यासाठी उत्तम अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रूपाली सातपुते यांनी दिले. त्यांनी आज जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे खाते प्रमुख मोहिमेचे संपर्क अधिकारी व तालुक्याचे गट विकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे आढावा बैठक घेतली कोविडवर(covid) नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्याच्या मुरबाड अंबरनाथ कल्याण भिवंडी शहापूर तालुका मोहीम राबविण्यात येत आहे.

काही दिवसापूर्वी तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या  हस्ते मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते या मोहिमेचा पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे या मोहिमेचे संवश्यित कोविड तपासणी व उपचार अति जोखमीचे व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोविड 19 (covid 19) प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण रुग्णाचे गृह  भेटीद्वारे संरक्षण कोविड (covid) तपासणी आणि उपचार आरोग्य शिक्षण आदी प्रमुख उद्दिष्ट आहे ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत आरोग्य विभागा मार्फत घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी पथकांची  नेमणूक करण्यात आलेली आहे. या पथकात आरोग्य कर्मचारी अशा अंगणवाडी कार्यकर्ती  स्थानिक स्वयंसेवक यांचा समावेश आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. नागरिकांना स्वयंस्फूर्तीने या मोहिमेत सहभागी करून घेण्याची सूचना श्रीमती रुपाली सातपुते यांनी केली. याशिवाय मोहिमेची प्रचार प्रसिद्धी गावात व्हावी यासाठी ग्रामपंचायतीच्या भिंतीवर माझे कुटुंब माझी जबाबदारी या आशेने  संदेश लिहिण्याची सूचनाही त्यांनी केली.

ठाणे

प्रतिनिधी  - सत्यवान तरे   

_______

Also see : नैसर्गिक नाला अडवल्याने व केमिकलयुक्त सांडपाणी नाल्यात सोडल्याने चिंचघर परिसरातील शेतकऱ्यांच नुकसान

https://www.theganimikava.com/Damage-to-farmers-in-Chinchghar-area-due-to-obstruction-of-natural-nala-and-discharge-of-chemical-effluent-in-nala