दिव्यात ठाणे आहे, पण ठाण्याच्या विकासात दिवा दिसत नाही...

ठाणे महापालिकेची  व्हिडिओ कॉन्फरन्स स्मार्ट सिटी पार पडली बैठक 

दिव्यात ठाणे आहे, पण ठाण्याच्या विकासात दिवा दिसत नाही...
There is Thane in Divya, but Diva is not seen in the development of Thane

दिव्यात ठाणे आहे, पण ठाण्याच्या विकासात दिवा दिसत नाही...

मनसेचे आमदार राजू पाटील यांचा सल्लागार समितीच्या बैठकीत टिका

ठाणे महापालिकेची  व्हिडिओ कॉन्फरन्स स्मार्ट सिटी पार पडली बैठक 

कल्याण : दिवा शहरात ठाणे पालिकेकडून अनधिकृत पणे कचरा टाकला जात आहे. तर बांधकामावर सतत कारवाई केली जाते आणि दिवा - शिळ विभागातून पालिकेत ११ नगरसेवक प्रतिनिधीत्व करत आहेत, परंतु ठाणे स्मार्टसिटी अंतर्गत घेतलेल्या कामात एक पैसा ही दिवा विभागात वापरला गेला नाही. यावर नाराजी व्यक्त करत मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रशासनाला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. 

केंद्र शासनाच्या स्मार्टसिटी प्रॅाजेक्ट अंतर्गत दिव्यात पाणी पुरवठ्यासाठी रिमोडलींग करणे. तसेच दातिवली, खिडकाळी येथील तलाव सुशोभीकरण करता आले असते, ठाण्यात विविध ठिकाणी २०० कोटीच्या वर खर्च करून खाडीकिनारा सुशोभीत केला जात आहे. मग दिवा डंपींग बंद करून तेथील खाडीकिनारा सुशोभीकरणाचा समावेश का केला नाही ?  दिवा स्टेशन परिसरात एलिवेटेड स्कायवॅाक व क्लस्टर सारखी योजना आणून दिव्याचे नियोजन करता आले असते. तर दिवा विभाग सुनियोजीत पद्धतीने विकसीत केल्यास येथून पालिका व राज्य शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देऊ शकतो या विषयाकडे देखील मनसे आमदार राजू पाटील यांनी बैठकीत उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. 

ठाणे महापालिकेची मंगळवारी ठाणे शहर स्मार्ट सिटी सल्लागार समितीची बैठक ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली त्यावेळी आमदार राजू पाटील यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत दिवा शहरातील समस्या मांडल्या.

कल्याण, ठाणे

प्रतिनिधी - कुणाल महात्रे

__________

Also see :मागासवर्गीय कुटुंबियांना मारहाण प्रकरणी तिघे गजा

https://www.theganimikava.com/Three-arrested-for-beating-up-backward-class-families