भाजपा शासित राज्यांत सत्तेचा गैरवापर नेहमीचा  -नरेंद्र बनसोडे

युवक काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या संयुक्त विद्यमाने योगींचा निषेध...

भाजपा शासित राज्यांत सत्तेचा गैरवापर नेहमीचा  -नरेंद्र बनसोडे
The usual abuse of power in BJP ruled states is Narendra Bansode

भाजपा शासित राज्यांत सत्तेचा गैरवापर नेहमीचा  -नरेंद्र बनसोडे

(युवक काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या संयुक्त विद्यमाने योगींचा निषेध)


पिंपरी चिचंवड (pimpri chinchwad) राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस (congress) व पिंपरी चिंचवड शहर युवक कॉंग्रेस (congress) यांच्या वतीने आज गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधुन जुनी सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाजवळ उत्तर प्रदेश मधील हाथरस व बलरामपूर येथे झालेल्या बलात्कारी घटनांचा तिव्र निषेध केला.

सर्व प्रथम महात्मा गांधी (mahatma gandhi) व लाल बहाद्दुर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. काँग्रेस नेते खा.राहुल गांधीना व काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी ना उत्तरप्रदेश येथे अत्याचारात बळी पडलेल्या कुंटूबियांना भेटण्यास रोखून व राहूलजीनां धक्का बुक्की करणाऱ्या योगी सरकारचा जाहिर निषेध करण्यात आला. 

यावेळी बोलताना युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, “उत्तरप्रदेश मध्ये वारंवार अशा अत्याचारच्या व अन्यायकारक घटना घडत आहेत व याचाच अर्थ असा कि तेथे कायदा सुव्यवस्था संपुष्टात आली असल्याने व परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने उत्तरप्रदेश सरकार बरखास्त करावे, ज्या प्रमाणे राहूल जींना अडविण्याचे काम योगी सरकारने केले त्या वरून हे लक्षात येते की सत्य बाहेर येऊ न देण्याचे काम योगी करत आहेत अन्यथा राहूल गांधींना अडविण्यामागचे दुसरे कारणच नाही, अशा घटना या संविधानविरोधी व लोकशाहीला मारक आहेत. काँग्रेस (congress) शासित राज्यांत असा दुजाभाव व अडवणूक कधीही केली गेली नाही हा सत्तेचा गैरवापर फक्त भाजपा शासित केला जातो व याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो तसेच वरील घटनांमधील आरोपींवर कडक शासन करण्यात यावे हा खटला जलदगती न्यायालयातून चालवला जावा तसेच संबंधित कुटूंबाला त्वरित संरक्षण देण्यात यावे अन्यथा अधिक तीव्र तेचे आंदोलन करण्यात येईल”

यावेळी युवक कॉंग्रेसचे (congress)  पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे शहर सरचिटणीस ऋषभ काटे  व ओंकार ढोरे, शंकर ढोरे उपस्थित होते.

निषेध सभेचे आयोजन चिंचवड विधानसभा युवक कॉंग्रेस (congress) उपाध्यक्ष सौरभ शिंदे व चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रणव ढमाले यांनी केले.

पिंपरी, पुणे
प्रतिनिधी - आत्माराम काळे

_______

Also see : डॉ. कुमार सप्तर्षी; 'सूर्यदत्ता ग्लोबल पीस रिसर्च फाउंडेशन'ची स्थापना

https://www.theganimikava.com/Dr-kumar-Saptarshi-Suryadatta-Global-Peace-Research-Foundation-established