"पगडी फाळा"शेकडो वर्षाची परंपरा आजही
नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड या अतिदुर्गम गावात शेकडो वर्षापासून सुरू असलेली 'पगडी फाळा' हि पद्धत आजही डांग या आदिवासी भागात सुरुच आहे.फाळा याचा अर्थ वर्गणी असा होतो.

"पगडी फाळा"शेकडो वर्षाची परंपरा आजही
नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड या अतिदुर्गम गावात शेकडो वर्षापासून सुरू असलेली 'पगडी फाळा' हि पद्धत आजही डांग या आदिवासी भागात सुरुच आहे.फाळा याचा अर्थ वर्गणी असा होतो.
आदिवासी समाजाची जीवनशैली ही निसर्गा सोबत सलोख्याने जगा अशी आहे.किती ही नैसर्गिक आपत्तीचे संकट आले तरी सामाजिक सलोख्याने जीवन जगणे, एकमेकांशी आदराने वागणे,मुलगा मुलगी एक समान,संकटाच्या वेळी एकमेकांना मदत करणे,चोरी न करणे,
अशा अनेक गोष्टी चांगल्या संस्कारक्षम गोष्टी आजही आदिवासी खेडोपाडी प्रचलीत आहेत.याच चांगल्या रुढी परंपरा, संस्कृति,चालीरीती यांना कधी कधी अंधश्रद्धा असे म्हटले जाते.पण या बारागाव डांगच्या सिमावर्ती भागात अनेक चांगल्या चालीरीती,परंपरा आजही जपल्या आहेत.
अशीच एक चांगली परंपरा तालुक्यातील पिंपळसोंड या गावी सुरुच आहे.ती अशी गावात एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर आदिवासी परंपरेने अग्निडाग अथवा भुईडाग देऊन अंत्यविधी केला जातो. अंत्यविधी उरकल्यावर मौतीला( मृत्यूच्या वेळी )आलेले गावकरी हातपाय धुतल्यावर एका जागेवर थांबतात त्याच ठिकाणी एक टाॅवेल अंथरला जातो. त्यावर यथाशक्तीने पैसे टाकले जातात. पाच,दहा रुपयां पासून मदत केली जाते. सहजपणे दोन ते अडीच हजार रुपये जमा होतात.
त्याला 'पगडी फाळा' असे म्हटले जाते. जमलेला आर्थिक निधी त्या कुटुंबाला तात्कालिक मदतनिधी म्हणून ग्रामस्थांकडून कुटुंबातील सदस्याकडे सुपूर्द केला जातो. गावातील व्यक्ति हा श्रीमंत असो की गरीब हा जमा केलेला निधी प्रत्येकाला प्रथेनुसार घ्यावाच लागतो.
या निधीतून दशक्रिया विधीचा खर्च केला जातो.त्यामुळे अत्यंत गरजू व गरीब कुटुंबाला आर्थिक हातभार व्हावा म्हणून हि तरतूद केली ग्रामस्थांकडून तातडीने उपलब्ध केली जाते. यातून थोड्याफार प्रमाणात आर्थिक मदत होत असल्याने चिंता दुर होते.हि अनोखी परंपरा आजही कायम अविरतपणे या भागात पहावयास मिळते. म्हणून आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक,धार्मिक, सामाजिकतेवर किती ही परकीय संस्कृतिची आक्रमण होत असली तरी काही चांगल्या परंपरा सुरुच आहेत ही समाजाची चागली विचारधारा आहे. आज ही आदिवासी बांधवांमध्ये सामाजिक बांधिलकी जपली जात असून
एकमेका साह्य करु,अवघे धरु सुपंथ या सुभाषिताचा प्रत्यय आल्या शिवाय रहात नाही. काळ ही बदलला तरी आदिवासींनी सामाजिक बांधिलकी जपली जाते आहे. त्यानिमित्त सर्व पिंपळसोंड येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
सुरगाणा
प्रतिनिधी - अशोक भोये
___________
Also see : आकाश दादा तुपसमुद्रे यांची आयटी बीड जिल्हाप्रमुख पदी निवड...!
https://www.theganimikava.com/Akash-Dada-Tupasamudre-elected-as-IT-Beed-District-Head