दुर्गाडीचे दुर्गा देवीचे मंदिर नवरात्रीत भाविकांसाठी राहणार बंद

दरवर्षी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मोठ्या दिमाखात नवरात्रौत्सव साजरा केला जातो.

दुर्गाडीचे दुर्गा देवीचे मंदिर नवरात्रीत भाविकांसाठी राहणार बंद
The temple of Goddess Durga will be closed for devotees on Navratri
दुर्गाडीचे दुर्गा देवीचे मंदिर नवरात्रीत भाविकांसाठी राहणार बंद

दुर्गाडीचे दुर्गा देवीचे मंदिर नवरात्रीत भाविकांसाठी राहणार बंद

कल्याण : दरवर्षी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मोठ्या दिमाखात नवरात्रौत्सव साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सर्वत्र मंदिरे बंद आहेत त्यामुळे उत्सव होणार नाही. तर साध्या पद्धतीने मंदिरात मंदिराचे पुजारी हे घटस्थापना करणार असून नवरात्रीच्या नऊ दिवस पूजा आणि सर्व विधी पार पडणार असल्याची माहिती कल्याण पश्चिमचे आमदार तथा कल्याण शिवसेना शहर प्रमुख विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे. तसेच भाविकांना दर्शनासाठी देखील मंदिर बंद असणार आहे.

नवरात्रीत दुर्गा देवीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. पाहाटे चार वाजल्यापासून स्त्रियाही दुर्गाडी किल्यावर  येवून देवीची खणानारळाने ओटी भारतात. तसेच रोज महाआरती, काकड आरती, भजने, कीर्तने, भारुडे होतात. ह्या दिवसात दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरात मोठी जत्रा भरते. त्याचबरोबर पाळणे, खेळाचे, खाऊचे वेगवेळे स्टॉल लागतात. तसेच घरातील शोभेच्या वस्तू, सौंदर्य प्रसाधने आदीही विकण्यास असतात. देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक कल्याणच्या आजूबाजूच्या गावातून शहरातून येत असतात. मात्र यावर्षी हे सर्व पाहायला मिळणार नसून भाविकांना देवीचे दर्शन देखील घेता येणार नसल्याने भक्तांमध्ये काहीशी नाराजगी आहे.

कल्याण, ठाणे

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे

_______________

Also see : महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे बीड शहरातील काही भागची बत्ती गुल -डॉ.नितीन सोनवणे

https://www.theganimikava.com/Due-to-the-management-of-MSEDCL-Golthan-the-lights-of-some-parts-of-Beed-city-went-out-Dr-Nitin-Sonawane