पक्षांतरा संदर्भात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपचा विषय झाला जुना; तीन-चार दिवसात येणार मोठी बातमी
आपल्या पक्षांतरा संदर्भात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपचा विषय जुना झाला असून आता तीन-चार दिवसात आपण मोठी बातमी देऊ, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव येथे दिली आहे...

पक्षांतरा संदर्भात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपचा विषय झाला जुना; तीन-चार दिवसात येणार मोठी बातमी
आपल्या पक्षांतरा संदर्भात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपचा विषय जुना झाला असून आता तीन-चार दिवसात आपण मोठी बातमी देऊ, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव येथे दिली आहे. भाजपच्या बैठकीत ऑनलाइन सहभागानंतर खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. या बैठकीनंतर ही खडसे समाधानी नसल्याचे संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळाले आहेत.
पक्षातील विविध आघाड्यांवर सातत्याने डावलले जात असल्याने माजी मंत्री एकनाथ खडसे हे नाराज असून याविषयी त्यांनी अनेक वेळा उघड भाष्य केले आहे. त्यानंतर महिनाभरात आपण निर्णय घेणार असून दुसऱ्या पक्षात केवळ काय पद मिळते याची प्रतीक्षा आहे, असा संवाद असलेली ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती.
बारामती
प्रतिनिधी - रूपेश महादेव नामदास
______
Also see : संसद अधिवेशन संपताच खासदार शेतकऱ्यांचा बांधावर
https://www.theganimikava.com/After-the-end-of-the-Parliament-session-the-MP-farmers-on-the-dam