कल्याणमधील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित

राष्ट्रवादी अर्बन सेलच्या प्रविण मुसळे यांच्या पाठपुराव्याला अखेरीस यश....

कल्याणमधील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित
The signal system in Kalyan is operational

कल्याणमधील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित

राष्ट्रवादी अर्बन सेलच्या प्रविण मुसळे यांच्या पाठपुराव्याला अखेरीस यश

कल्याण (kalyan) : गेल्या काही वर्षांमध्ये कल्याण डोंबिवली शहरात झपाट्याने नागरीकरण झाले असून वाढत्या लोकसंख्येमुळे येथील समस्या देखील वाढल्या आहेत. यातील एक मुख्य समस्या म्हणजे वाहतूक कोंडी. या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून कल्याण डोंबिवलीत सिग्नल यंत्रणा सुरु करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस (congress) अर्बन सेल महाराष्ट्र प्रदेश सदस्य प्रविण मुसळे यांनी पालिका प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेरीस यश आले आहे. कल्याण मधील काही चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली असून काही ठिकाणी हि यंत्रणा कार्यान्वित देखील झाली आहे.   

कल्याण-डोंबिवली शहरात प्रचंड वाहतुक कोंडी होते. जनता तास न तास वाहतुक कोंडी मध्ये अडकून असते त्यामुळे शाळेला जाणारे विद्यार्थी, कामासाठी जाणारा नोकरदारवर्ग, रुग्णवाहिका, रस्ता ओलांडताना सर्वसामान्य जनतेला आणि ज्येष्ठ नागरीकांना त्रास होत असतो. या वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता व्हावी यासाठी राष्ट्रवादीच्या प्रविण मुसळे यांनी २७ ऑगस्ट २०१८ रोजी तत्कालीन वाहतुक पोलीस उपआयुक्त अमित काळे यांची भेट घेत निवेदन दिले. तसेच या वाहतूक कोंडीबाबत चर्चा केली.

अमित काळे यांनी याची दखल घेतली व तत्कालीन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे (muncipal corporation) आयुक्त गोविंद बोडके यांना पत्र पाठवले. मुसळे यांनी आयुक्त गोविंद बोडके यांना निवेदन देऊन सिग्नल यंत्रणेवर सविस्तर चर्चा देखील केली. सुरुवातीला प्रशासनाकडुन या लोकोपयोगी विषयाची दखल हवी तशी घेतली जात नव्हती. त्यासाठी प्रशासनातील या विषया संदर्भातील अधिकारी वर्ग यांच्याशी सातत्याने भेटुन निवेदन देऊन सविस्तर चर्चा करून व सिग्नल यंत्रणा कल्याण-डोंबिवली शहरासाठी किती आवश्यक आहे हे समजावुन सांगण्याचा प्रयत्न प्रविण मुसळे यांनी वेळोवेळी केली.

अखेर पालिका प्रशासनाने याची दखल घेत स्मार्टसिटी प्रकल्पाअंतर्गत कल्याण-डोंबिवलीतील प्रमुख २० चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेण्यात आले. या लॉकडाऊनच्या काळात सिग्नल यंत्रणा शहरात प्रत्यक्षात बसविण्याचे काम सुरु करण्यात आले असून कल्याण पश्चिम येथील खडकपाडा सर्कल, संदिप हॉटेल चौक, आधारवाडी चौक, प्रेम ऑटो चौक याठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. यापैकी आधारवाडी चौक याठिकाणी हि यंत्रणा कार्यन्वित देखील झाली असून नागरिकांचा देखील याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.  

गेली सलग दोन वर्ष कल्याण-डोंबिवली शहरात सिग्नल यंत्रणा असावी या लोकोपयोगी विषयाचा प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश मिळतयं हे बघुन माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनाला आत्मिक समाधान मिळाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेस अर्बन सेलचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य प्रविण मुसळे यांनी व्यक्त केली आहे.

कल्याण , ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे

________

Also see : भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

https://www.theganimikava.com/5-lakh-assistance-to-the-families-of-the-victims-of-the-accident-in-Bhiwandi