सांगलीमध्ये बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून अत्याचार प्रकरणी रॅली संपन्न.....
सांगली मध्ये बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून अत्याचाराच्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये एकाच दिवशी 550 जिल्ह्यांच्या ठिकाणी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते...

सांगली मध्ये बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून हा अत्याचार प्रकरणी रॅली संपन्न झाली.
हाथरस याठिकाणी मनीषा वाल्मिकी या भगिनी वर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी दि. 15 ऑक्टोंबर 2020 रोजी बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्या आदेशानुसार संपूर्ण भारतामध्ये एकाच दिवशी 550 जिल्ह्यांच्या ठिकाणी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
त्याचाच एक भाग म्हणून आज सांगली मध्ये सुद्धा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अचानक सुरू झालेल्या पावसाळी वातावरणात सुद्धा सदर रॅली यशस्वीरित्या संपन्न झाली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी बहुजन क्रांती मोर्चा चे संयोजक डॉ. राजेंद्र कवठेकर,शेवंता वाघमारे, लहुजी क्रांति मोर्चा सांगली जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ सकट,अल्लाबक्ष मकानदार, सचिन आवळे,गौतम शिंगे,मुफ्ती मुजम्मील यांनी मार्गदर्शन केले.
या रॅलीमध्ये सुजाता पवार, प्रशांत कांबळे, गौतम शिंगे, इम्रान मुल्ला, मोसिन शेख, देवधर सांगले, फारुख संगतरास इत्यादी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
सांगली
प्रतिनिधी - जगन्नाथ सकट
__________
Also see : आधीच केडीएमसीत खड्डेमय रस्ते, त्यात पोकलेनने उकरला रस्ता
https://www.theganimikava.com/Already-rocky-roads-with-KDMC-including-the-road-dug-by-Poklen