शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावणाऱ्या बिल्डरचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करणार
आमदार शांताराम मोरे यांचे पिडीत शेतकऱ्यांना आश्वासन...

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावणाऱ्या बिल्डरचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करणार
आमदार शांताराम मोरे यांचे पिडीत शेतकऱ्यांना आश्वासन
कल्याण : शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावणाऱ्या बिल्डरचा प्रश्न विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे आश्वासन शिवसेना आमदार शांताराम मोरे यांनी वरप येथील पिडीत शेतकऱ्यांना दिले आहे. आज त्यांनी या शेतकऱ्यांची भेट घेऊन विचारपूस केली.
कल्याण जवळील ग्रामीण भागात वरप गावातील १३ एकर जमिनीवरून शेतकरी आणि बिल्डर यांच्यात वाद आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या कब्जात असलेल्या या जमिनीवर शेतकरी शेती करत असून हातात आलेले पीक कापण्यासाठी शेतकरी सज्ज झालेले असतानाच बिल्डरने हे शेत कापून नासधूस करत जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मागील चार महिन्यापासून मेहनत करून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाले असून आपल्याला न्याय देण्याची मागणी केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच आज शिवसेना आमदार शांताराम मोरे यांनी पीडित शेतकरी कुटुंबाची भेट घेत त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. विदर्भ मराठवाड्यात गरीब शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रकार कायमच घडत असतात मात्र आता ते लोण कल्याण पर्यत पोचल्याची भीती व्यक्त करत अशा मुजोर बिल्डरवर तातडीने कारवाई व्हावि यासाठी टिटवाळा पोलिसांची भेट घेत आमदारांनी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. हा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडत हे लोण कल्याण परिसरात फोफावण्या आधीच ते थांबविण्याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे
_________
Also see : कळवण तालुक्यात भाजपाचे श्रीक्षेत्र सप्तशृंगी देवी निवासीनी येथे पहिल्या पायरीवर लाक्षणिक उपोषण.......!