बारामतीमध्ये कोरोनाची संख्या दिवसेंदिवस तीव्रता कमी होत आहे...
कोरोनाची तीव्रता दिवसागणिक कमी होऊ लागल्याचे आकडेवारीवरुन समोर येऊ लागले आहे...

बारामतीमध्ये कोरोनाची संख्या दिवसेंदिवस तीव्रता कमी होत आहे
कोरोनाची तीव्रता दिवसागणिक कमी होऊ लागल्याचे आकडेवारीवरुन समोर येऊ लागले आहे. कोरोनाचा ताण आता हलका होऊ लागला आहे. बारामतीचा कोरोनाचा आलेख कमी होऊ लागल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बारामतीत तपासण्यांच्या तुलनेत पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
बारामती शहरापेक्षा तालुक्यातील रुग्णांची संख्या अधिक असण्याचे प्रमाण कायमच असल्याने हे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. अधिकाधिक तपासण्यांवर अजूनही प्रशासनाचा भर आहे. मात्र आता लोकांच्या मनातील भीती दूर झाली असून त्याची जागा आता सतर्कतेने घेतलेली आहे. मास्क, सॅनेटायझर तसेच इतर पूरक बाबींचा वापर वाढलेला दिसत आहे. बारामतीची रुग्णसंख्या जरी 3285 पर्यंत गेलेली असली तरी बरे झालेल्या रुग्णांची संख्याही 2513 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. मृत्यूचा आकडा 82 वर गेला आहे.
बारामती
प्रतिनिधी - रूपेश महादेव नामदास
________
Also see :डॉक्टरांनो संकट काळात सतर्क राहून मृत्यूच प्रमाण कमी करा , खा .डॉ . प्रितम ताई मुंडेचे अव्हाण