संशयित मीटर दडवून मॉल चालकाची महावितरणच्या भरारी पथकाला दमदाटी

 उल्हासनगर येथील सोनार गल्लीतील बी.के. स्मार्ट मॉलमध्ये मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरणच्या भरारी पथकाला शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली.

संशयित मीटर दडवून मॉल चालकाची महावितरणच्या भरारी पथकाला दमदाटी
The mall driver hid the suspected meter and pushed the MSEDCL team

संशयित मीटर दडवून मॉल चालकाची महावितरणच्या भरारी पथकाला दमदाटी

 

कल्याण (Kalyan) :  उल्हासनगर येथील सोनार गल्लीतील बी.के. स्मार्ट मॉलमध्ये मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरणच्या भरारी पथकाला शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. वीजचोरीशी संबंधित मीटर दडवून दुकान चालक व त्याच्या भावाने गुरुवारी सायंकाळी हे कृत्य केले असून त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा व अनुषंगिक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका आरोपीला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे.

सुनील दवाणी आणि अनिल दवाणी अशी या शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. महावितरणच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता धनंजय सातपुते यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सायंकाळी बी.के. स्मार्ट मॉलला पथकाने भेट दिली व त्यांच्याकडील दोन्ही वीज जोडण्याचे मीटर दाखविण्यास सांगितले. मात्र दवाणी बंधूनी शिवीगाळ व दमदाटी करत पथकाला मॉलबाहेर काढले. दरम्यान पोलिसांची मदत मागविण्यात आली. परंतु दवाणी बंधूनी उडवाउडवीची उत्तरे देत मीटर दाखविणे टाळले. संबंधित वीज मीटर दुकानाबाहेर असल्याचा बहाणा करून आरोपींनी भरारी पथक व पोलिसांनाही मॉलबाहेर येण्यास भाग पाडले व रिमोटच्या साह्याने मॉलचे शटर बंद करून पोबारा केला.

याठिकाणी मोठ्या प्रमाणात वीजचोरी होत असल्याचा संशय असून मीटर तपासणीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. सातपुते यांच्या फिर्यादीवरून उल्हासनगर पोलिसांनी दवाणी बंधूं विरुद्ध गुन्हा दाखल करून एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामात सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे.

कल्याण, ठाणे 
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

__________

Also see : पंजाब नॅशनल बँकेच्या ग्रामसंपर्क अभियानाच्या अंतर्गत शाखा मेट येथे कर्ज वितरण मेळावा

https://www.theganimikava.com/Debt-distribution-meet-at-branch-met-under-Punjab-National-Banks-Gram-Sampark-Abhiyan