कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार केलेले पिपिई किट उघड्यावर पडून
उघड्यावरील पिपिई किटमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती....
कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार केलेले पिपिई किट उघड्यावर पडून
उघड्यावरील पिपिई किटमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती
कल्याण (kalyan) :कोरोना (corona) मृतांवर अंत्यसंस्कार करतांना वापरलेल्या पिपिई किटची सुरक्षितरीत्या विल्हेवाट लावणे गरजेचे असतांना कल्याणच्या बैल बाजार स्माशनभुमीत या कोरोना पिपिई किटचा कचरा उघड्यावर पसरलेला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे पिपिई किट वाऱ्याने अथवा कुत्र्यांनी इतरत्र पसरविल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याण पश्चिमेतील बैल बाजार स्माशनभुमी येथे गँस शवदाहिनी तसेच लाकडाच्या साहय्याने अग्निदाह देण्यासाठी बर्निंग स्टँन्ड उपलब्ध आहे. कोवीड पार्श्वभूमीवर प्रशासनाचा लढा सुरू आहे. कोरोनामुळे मुत्यु झालेल्यां पैकी काही मृतदेहांवर बैल बाजार स्माशनभुमी मध्ये अंतिम संस्कार करण्यात येत आहेत. कोरोना मुतदेहांवर अंतिम संस्कार करणाऱ्याचे काम हे एक प्रकारचे दिव्य असुन अंतिम संस्काराचे काम करणाऱ्याचे धाडस व सामाजसेवेच्या कार्याला सलाम करण्याजोगे आहे. पर्ंतु बैल बाजार स्माशनभुमीत पिपिई किटचा कचरा इतरत्र पसरलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
घनकचरा विभाग कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी लाखो रूपये खर्च करते. कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना वापरलेले पिपिई किटची विल्हेवाट कोविडच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार लावणे गरजेचे आहे. याठिकाणी इतरही मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याने बैल बाजार स्मशान भुमीतील इतरत्र पसरलेला पीपीई कीट कचर्याबाबत तसेच या कचर्याच्या माध्यमातून कोरोना संसर्गाचा धोका पाहता पालिका प्रशासन उदासीन का असा प्रश्न उभा ठाकला आहे.
दरम्यान याबाबत घनकचरा विभागाचे उपआयुक्त यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सदर बाब गंभीर असुन या बाबत दक्षता घेणार असुन तसेच कायम माणुस ठेवुन याबाबत लक्ष देणार आहे. पीपीई कीट कचऱ्याची कोवीडच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विल्हेवाट लावली जाते. याबाबत प्रशासन दक्ष भुमिका घेईल जेणेकरून असा प्रकार पुन्हा घडणार नाही."
कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे
__________
Also see : मुंबई - पुणे महामार्गावरील दापोडी येथील जुना हॅरिस पुल वाहतुकीसाठी खुला....