बारवी प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या मुलांचा नोकरीचा प्रश्न मार्गी
०१ ऑक्टोबरला होणार 209 प्रकल्पबाधित मुलं कामावर रुजू....

बारवी प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या मुलांचा नोकरीचा प्रश्न मार्गी
०१ ऑक्टोबरला होणार 209 प्रकल्पबाधित मुलं कामावर रुजू
मुरबाड तालुक्यातील बारावी प्रकल्प हा संपूर्ण महाराष्ट्रमध्ये एक नवीन पॅटर्न बनवत चालला आहे बारावी प्रकल्पग्रस्तांचे आत्तापर्यंत संपूर्णपणे बहुतेक पुनर्वसन झाले आहे. त्यामध्ये फक्त प्रकल्पग्रस्तांच्या मुलांचा सरकारी नोकरीचा प्रश्न निर्माण झाला होता. तो कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून मार्गी लागलेला आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 209 मुलांना ०१ ऑक्टोंबर पासून सरकारी नोकरी मध्ये सामील केले जाणार आहे. असे आमदार किसन कथोरे यांनी आधार न्यू शी बोलताना सांगितले आहे. त्याप्रमाणे येत्या दोन दिवसात महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते कोरोणाच्या पार्श्वभूमीवर चार ते पाच प्रकल्पग्रस्त मुलांना नोकरीचे ऑर्डर नियुक्ती पत्र त्यांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे दिले जाणार आहे. त्यामुळे आमदार किसन कथोरे यांच्या संघर्षामुले 1972 पासून रेंगाळलेला बारावी प्रकल्प ग्रंथांचा नोकरीचा प्रश्न आज सुटलेला आहे. असे बारवी प्रकल्पग्रस्त अध्यक्ष कमलाकर भोईर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले यावेळी कार्यक्रमाला भाजप मुरबाड तालुका अध्यक्ष जयवंत सुर्याराव ,,ठाणे जिल्हा सरचिटणीस नितीन मोहोपे ,भाजपा उपाध्यक्ष भास्कर वडवले ,शिवसेना नेते रामभाऊ दळवी, बारावी प्रकल्प संघटनेचे उपाध्यक्ष हरिष पुरोहित ,मुरबाड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे, पंचायत समिती सभापती श्रीकांत धुमाळ, तोंडली ग्रामपंचायतीच्या सरपंच नायब तहसीलदार बंडु जाधव ,बारावी प्रकल्प अधिकारी विलास रेपाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुरबाड
प्रतिनिधी - लक्ष्मण पवार
__________
Also see : माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची सफाळयात सुरुवात
https://www.theganimikava.com/My-family--my-responsibility--campaign-started-at-safale-palghar