रेल्वे कँटीनच्या निर्माणाधीन इमारतीत आढळला मृतदेह

रेल्वे कॅन्टीनची इमारत उभारण्यासाठी जमीनिवर भरणींचे काम सुरू असताना  जमिनीखाली पुरलेला मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना कल्याणच्या वाळधुनी परिसरात उघडकीस आली आहे.

रेल्वे कँटीनच्या निर्माणाधीन इमारतीत आढळला मृतदेह
The body was found in the under-construction building of the railway canteen

रेल्वे कँटीनच्या निर्माणाधीन इमारतीत आढळला मृतदेह


हत्या करून मृतदेह पुरल्याचा संशय

कल्याण : रेल्वे कॅन्टीनची इमारत उभारण्यासाठी जमीनिवर भरणींचे काम सुरू असताना  जमिनीखाली पुरलेला मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना कल्याणच्या वाळधुनी परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

     कल्याण रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या वालधुनी परिसरात जमिनीखाली पुरलेला मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. रेल्वेकडून कॅन्टीनसाठी इमारत उभारण्याचे काम सुरू असून याठिकाणी आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास भरणीचे काम सुरू असताना मृतदेह आढळला.  कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सदर इसमाची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी सदरचा मृतदेह पुरल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला असून याप्रकरणी मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे सहययक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी सांगितले.

कल्याण, ठाणे 

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे

____________

Also see : मुख्यमंत्री योगी राजीनामा द्या -  मातंग समाजाची मागणी

https://www.theganimikava.com/Resign-Chief-Minister-Yogi--Demand-of-Matang-community