तब्बल २८ तासाने चांदापूर तलावात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
परळी तालुक्यातील चांदापूर तलावात बुडालेल्या 19 वर्षीय मुलाचा तब्बल 28 तासाने मृतदेह सापडला असून प्रशासनाच्या अथक परिश्रमाला यश आलंय.

तब्बल २८ तासाने चांदापूर तलावात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
बीड :परळी तालुक्यातील चांदापूर तलावात बुडालेल्या 19 वर्षीय मुलाचा तब्बल 28 तासाने मृतदेह सापडला असून प्रशासनाच्या अथक परिश्रमाला यश आलंय. आज बीड हुन विशेष बोट पाचारण करण्यात आली होती सकाळी सहा वाजलेपासून शोध मोहीम सुरू होती.
चांदापूर ता परळी येथील तलावात शेख खाजा शेख मीर वय 23 वर्ष हा तरुण पोहायला गेला व पाण्यात बुडाला. काल दिवसभर स्थानिक प्रशासन महसूल,पोलीस, नगरपालिका व सामाजीक कार्यकर्ते यांच्या मार्फत शोध मोहीम घेतली पण यश आणि आज तब्बल सव्वीस तासाने त्या बुडालेला तरुणाचा मृतदेह सापडला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत आत्महत्या की आकस्मात मृत्यू याबाबत अजून स्पष्ट कारण समोर आले नाही.
बीड
प्रतिनिधी -विश्वनाथ शरणांगत
_________
Also see : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित मुलीच्या अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया [आ ]बीड येथे तीव्र आंदोलन