२० सप्टेंबर रोजी होणाऱ्या प्लस पोलिओ मोहिमेची यशस्वी अमलबजावणी करण्यात येणार

२० सप्टेंबर २०२० रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर आणि वसई या तीन तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात आला आहे......

२० सप्टेंबर रोजी होणाऱ्या प्लस पोलिओ मोहिमेची यशस्वी अमलबजावणी करण्यात येणार
The Plus Polio Campaign on September 20 will be successfully implemented

२० सप्टेंबर रोजी होणाऱ्या प्लस पोलिओ मोहिमेची यशस्वी अमलबजावणी करण्यात येणार

जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ


    पालघर (palghar) :  २० सप्टेंबर २०२० रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम पालघर (palghar) जिल्ह्यातील डहाणू, पालघर आणि वसई या तीन तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात आला  आहे. जागतिक आरोग्य (world health day) संघटनेने सन १९८८ मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले आणि त्यानुसार राज्यात सन १९९५  पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण (Polio vaccination) मोहीम दरवर्षी राबविण्यात येत आहे. पालघर ग्रामीण व वसई महानगरपालिका क्षेत्रातही ही मोहीम दरवर्षी यशस्वीरित्या  राबविली जाते. सर्व बालकांना  विहित वयात प्राथमिक लसीकरण, नियमित सर्वेक्षण, आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत ० ते ५ वर्षाखालील सर्व बालके संरक्षित करणे ही पोलिओ निर्मूलनाच्या यशासाठी असलेली त्रिसूत्री पालघर जिल्ह्यात नियमितपणे राबविले जाते त्यानुसार या २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या लसीकरण मोहिमेला देखील सर्व पालकांनी  उस्फुर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी केले.
    पल्स पोलिओ लसीकरण (Polio vaccination) मोहिमेची टास्क फोर्स बैठक जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.
    पोलिओ (Polio) बाबत अधिकाधिक जनजागृती व्हावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी सरपंच नगराध्यक्ष नगरसेवक पोलीस पाटील जिप सदस्य ग्रापं सदस्य तसेच इतर सर्व लोकप्रतिनिधी यांनी मोहिमेचे उद्घाटन करावे असे विनंतीवजा आवाहन देखील यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले.

       कोरोना (corona) काळात लहान बालकांना लसीकरण (vaccination) करते वेळी शासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच लसीकरण(vaccination) केले जाणार आहे. बुथवर सॅनिटायझर, हात धुण्याची व्यवस्था लसीकरण करणाऱ्या कर्मचारी स्वयंसेवक यांनी मास्क आणि ग्लोव्हज घालणे, प्रत्येक लाभार्थ्याला लसीकरण केल्यानंतर आपल्या हात सॅनिटाईज करणे, येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये योग्य ते अंतर ठेवण्यात येणे, सामाजिक अंतर पाळणे, घर भेटीच्या वेळेस सॅनिटायझर मास्क व ग्लोव्ज सोबत घेऊन जाणे, लहान बालकांना स्पर्श न करता केवळ मातेच्या स्पर्शानेच बालकांना लस पाजणे, व इतर अनेक नियम यावेळी पाळण्यात येऊन लसीकरण करणार  असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दयानंद सूर्यवंशी यांनी दिली.
 अशांच्या माध्यमातून नियमित पणे लहान बालकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याचे काम केले जाते अशी माहिती यावेळी अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद चव्हाण यांनी दिली.
    सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरण मोहीम राबवली बुथवर जाईल. त्यानंतर ग्रामीण भागात ३ दिवस व शहरी भागात ५ दिवस याप्रमाणे घरभेट देऊन राहून गेलेल्या बालकांना लस देण्यात येईल.
या बैठकीस अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र केळकर, WHO चे प्रतिनिधी डॉ.किशोर चव्हाण,  सहा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सागर पाटील. वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिनकर गावित उपस्थित होते.

सफळे पालघर 
प्रतिनिधी- रविंद्र घरत 

______

Also see: शेतकरयांना जास्त भाव देण्याचं आमिष दाखवित १९ लाखांचा गंडा  

https://www.theganimikava.com/Rs-19-lakh-scam-to-lure-farmers-to-pay-higher-prices