ठाण्यातील उद्यापासून हॉटेल रेस्टोरंट बार रात्री 11:30 पर्यंत खुली राहणार...

ठाण्यात हॉटेल्स,रेस्टॉरंट, फूड कोर्ट आणि बार रात्री ११.३० पर्यंत सुरु ठेवण्यात संमती देण्यात आली आहे...

ठाण्यातील उद्यापासून हॉटेल रेस्टोरंट बार रात्री 11:30 पर्यंत खुली राहणार...
The Hotel Restaurant Bar in Thane will be open till 11:30 pm from tomorrow

ठाण्यातील उद्यापासून हॉटेल रेस्टोरंट बार रात्री 11:30 पर्यंत खुली राहणार

ठाण्यात हॉटेल्स,रेस्टॉरंट, फूड कोर्ट आणि बार रात्री ११.३० पर्यंत सुरु ठेवण्यात संमती देण्यात आली आहे. उद्यापासून म्हणजे १० ऑक्टोबरपासून सकाळी ७ ते रात्री ११.३० या वेळेत खुली ठेवण्यास संमती दिली आहे. हॉटस्पॉट क्षेत्राव्यतिरिक्त संपूर्ण शहरात राज्य ३० सप्टेंबर २०२० रोजी उपरोक्त संदर्भ ४ च्या आदेशान्वये जाहीर केल्याप्रमाणे मिशन बिगिन अगेन सुरु राहिल. तर हॉटेल्स, फूड कोर्ट,रेस्टॉरंट  आणि बार सकाळी ७ ते रात्री ११.३० या वेळेत संमती देण्यात आली आहे. हॉटस्पॉट क्षेत्रांमध्ये ३१ ऑक्टोबरच्या रात्री १२ पर्यंत लॉकडाउन सुरु राहिल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

मिशन बिगिन अगेन अंतर्गत ठाणे महापालिकेने मॉल व व्यापारी संकुलांमधल्या सिनेमागृहांसह स्विमिंग पूल, एन्टरटेन्मेंट पार्क, ऑडिटोरियम, अशा प्रकारचे अन्य हॉल वगळता सर्व भाजी मार्केट आणि दुकाने तसंच हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्तराँट, बार यांच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेच्या मर्यादेत सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत खुली ठेवण्यास संमती दिली होती. आता ही वेळ वाढवण्यात आली आहे. सकाळी ७ ते रात्री ११.३० या काळात ही संमती देण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यातील बार, रेस्टॉरंट , फूड कोर्ट आणि हॉटेल्स सकाळी ७ ते रात्री ११.३० या वेळेत खुली असणार आहेत.


भिवंडी, ठाणे  

प्रतिनिधी - सत्यवान तरे

_____________

Also see : नविमुंबई पोलिसांनी ३६ लाखाच्या गुटखा व पांनमसाला सह ५० लाखाचा मुद्देमाल केला जप्त.

https://www.theganimikava.com/NaviMumbai-police-seize-goods-worth-Rs-50-lakh-along-with-gutka-and-panna-masala-worth-Rs-36-lakh