डोनेट एड सोसायटी , स्वप्न माझं कार्यमग्नात पुर्ण होईल...

डोनेट एड सोसायटीचे कार्य दिन दुबळ्यास बनवते सक्षम मदतीस सदैव तत्पर असते दास बनुनी होते सेवा धाम कोणी हतबल होते, त्यासी दास मजबूत बनवते जगण्यास बळ साह्य दास होते.....

डोनेट एड सोसायटी , स्वप्न माझं कार्यमग्नात पुर्ण होईल...
The-Donate-Aid-Society-dream-will-come-true-in-my-work

डोनेट एड सोसायटी
---------------------------------------------
स्वप्न माझं कार्यमग्नात पुर्ण होईल...

डोनेट एड सोसायटीचे कार्य
दिन दुबळ्यास बनवते सक्षम
मदतीस सदैव तत्पर असते
दास बनुनी होते सेवा धाम           

कोणी हतबल होते,
त्यासी दास मजबूत बनवते
जगण्यास बळ साह्य दास होते

मी किरण ज्ञानेश्वर सोनवणे,माझं वय आता (२८वर्ष)आहे.  रा.मालेगांव कॅम्प  मला दोन मुली आणि एक मुलगा आहे.माझे मिस्टर मार्केट मध्ये हमालीचं काम करतात माझ्या बद्दल सांगायचे झालं तर मी अनेक वाईट प्रसंगांना तोंड दिले आहे. पण मी आत्मविश्वास कधी गमवला नाही  अवधान अनेक वाईट प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतं जातात, जात असतात. परंतु आपले कतृत्व ठळक पणे दिसल्यावर वाईट प्रसंग ही बाद होतात.हे मात्र खरं आहे.

२०१० मध्ये शिलाईन कामात सहा महिन्यांचं प्रशिक्षण घेतलं चांगल्या प्रकारे मी शिवण कामाचा अनुभव घेतला छान छान डिझाईनिंग कपडे शिवु लागली, माझ्या आई वडीलांनी मला त्यावेळेस सेकंड मध्ये शिलाईन मशिन घेऊन दिलं होते,  तेव्हा माझ्यातला आत्मविश्वास द्विगुणित वाढला प्रचंड उत्साह,आनंद माझ्या दैनंदिन जीवनात मला जाणवत होता. शिलाईन मशिन सेकंड जरी होतं तरी माझ्यासाठी मोठं गिप्ट होतं, माझ्या हातावर ची कला जोपासण्यासाठी एक उच्च कोटीतलं विकसित साधन होतं

शिलाईन कामात मी अनेक प्रकारे छोटी मोठी कामे करू लागली घराला हातभार लागावा  माझ्या लेकरं बाळांचा दैनंदिन खर्च भागावा या आशेनं माझं शिवण काम चालूच ठेवलं,चांगल्या कामाचा चांगला फायदा मिळतो या हिशोबाने मी चांगल्या प्रकारे शिवण काम करू लागली. आपली क्षमता, आत्मविश्वास,अवघड काम यशस्वी करतं वाईट प्रसंगाला मी कधी ही खचलो नाही,उलट मी वाईट प्रसंगाचं स्वागत करू लागली. कारण आपण खचल्यावर अपंगतत्वाचं लाचारी पण आपल्यात समरस होतं,म्हणून न खचता पणती सारखं सदैव प्रकाश देत तेवत रहायचं हा गुणधर्म माझ्या आई वडीलांच्या संस्कारांने जागृत झाला. शिवण कामाच्या उत्तुंग भरारीने चांगले अनुभव प्रत्ययास आले परस्थिती जरी नाजुक असली तरी आपल्या मनगटातलं बळ भक्कम पणे संचारत आहे.

नियती आपल्या आयुष्यात काय काय खेळ खेळते प्रत्येकाच्या आत्म्यालाचं माहीत २०१९ मध्ये माझ्या मिस्टरांचा अक्सिडंट झाला होता पायाला जबर मार लागल्याने मोठी जखम झाली होती त्यांचे उपचार करण्यास पुरेसे पैसे नसल्याने मी शिलाईन मशिन ३हजारला विकुन टाकले,त्यांचा उपचार केला दोन महिने त्यांचं काम थांबलं आणि माझ्या हातावरचं ही काम थांबलं दुसरं काही साधन नव्हतं दोन तीन महिने आई वडीलांनी अन्न ,धान्य ,बाजार हाट पुरवला  त्यांचीही परस्थिती नाजुक असल्याने मला मदतीची आशा नव्हती ,जे होईल ते सर्व काही त्या भाग्यविद्यात्यावर सोडलं होतं मी खरं म्हणजे आई वडीलचं आपले  खरे देव आहेत त्यांना  आपल्या लेकरांची काळजी वाटते.

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर हातावरचं काम गेलं सहा सात महिने झाले तरी हातावर कवडी मोल साधन नाही माझा माझ्या मुला बाळांचा खान्याचा प्रश्न,आरोग्याचा प्रश्न कसा भागेल या आशेनं  मी किरण सोनवणे आपणास कळकळीची विनंती करते की मला माझ्या हातावरचे साधन मिळवुन द्यावे, पुन्हा माझा आशेचा किरण फुलकीत व्हावा पुन्हा मी कार्यमग्न व्हावे....शिलाईन मशिनने पुन्हा सुखाचा शुभारंभ नक्की होईल माझ्या आयुष्यात "तुमचा मदतीचा हात,माझ्या परस्थिवर मात करेल"..

माझ्या परस्थितीची दखल घेत  *डोनेट एड सोसायटीचे  सहकार्यनी किशोरी (ताई) अग्निहोत्री व नितीन घोडके यांनी डोनेट एड सोसायटीची सर्व माहिती दिल्यावर श्री सुरेशजी चौधरी व गौतम जगताप यांना सांगितल्या प्रमाणे एका हतबल महिलेला सक्षम कसं बनवायचं एक मदत कशी सत्कर्मी लावायची परस्थितीला सुधारण्यासाठी दुकानातून किराणा माल घेण्या ऐवजी स्वत:च्या पायावर उभे रहाण्यासाठी शिलाईन मशिन घेऊन रोजगार प्राप्त व्हावा

डोनेट एड सोसायटीच्या वतीने  स्वप्नील डफल  यांचे मित्र दाते- राहुलजी पाटील साहेब यांच्या मोलाच्या  साह्याने माझ्या सारख्या कित्येक दुर्बल घटकातील हतबल महिला डोनेट एड सोसायटीच्या मदतीने सक्षम बनतील पुन्हा त्यांचं स्वप्न कार्यमग्नात पुर्ण होईल.

डोनेट सोसायटीचे सर्व सहकारी व अनमोल कार्यदर्शक दाते- राहुलजी पाटील यांचे खूप खूप आभार...आपले असेचं कार्य किर्तीवंत होवो.... धन्यवाद

             संवाद संकलन
          गौतम केदारनाथ जगताप

पिंपरी चिंचवड 
प्रतिनिधी - संस्कृती गोडसे 

_______

Also see :  सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास 500 रुपये दंड

https://www.theganimikava.com/A-fine-of-Rs-500-for-not-wearing-a-mask-in-a-public-place