तलवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराची पत्रकारांच्या माध्यमातून झाली साफसफाई 

गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या सभोवताली झाडे -झुडपे, वेली, वेडया बाभळी व गवताचे साम्राज्य निर्माण झाले होते.

 तलवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराची पत्रकारांच्या माध्यमातून झाली साफसफाई 
The Chhatrapati Shivaji Maharaj Chowk area at Talwada was cleaned by journalists

 तलवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराची पत्रकारांच्या माध्यमातून झाली साफसफाई 

छत्रपती संभाजीराजे देणार चौकाला भेट 

गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या सभोवताली झाडे -झुडपे, वेली, वेडया बाभळी व गवताचे साम्राज्य निर्माण झाले होते. चौकाची साफसफाई व स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी पत्रकार बांधवांनी स्वतः पुढाकार घेऊन तेथील वाढलेले गवत व झाडे काढली. त्यानंतर तीन जेसीबी मशीन व एका ट्रॅक्टरच्या माध्यमातून झाडे - झुडपे काढून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. जवळपास एक ते दीड तास चाललेल्या या कामासाठी जेसीबी मालक  - बाळू शिंदे, पालवे, शेख लालाभाई व ट्रॅक्टर मालक ऋषी मरकड यांनी एक रूपया देखील न घेता सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून मोलाचे योगदान दिले. हा स्तुत्य उपक्रम पत्रकार बापू गाडेकर, सुभाष शिंदे, अल्ताफ कुरेशी, अशोक सुरासे तसेच आरपीआयचे तलवाडा सर्कल अध्यक्ष - विनोद आठवले यांच्या पुढाकारातून राबविण्यात आला. यावेळी तलवाडा व परिसरातील युवक व नागरिक आवर्जून उपस्थित होते. 

खा.छत्रपती संभाजीराजे भोसले हे गेवराई तालुक्यातील ओल्या दुष्काळाची स्थिती व नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. यानिमित्ताने ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात भेट देऊन श्रीक्षेत्र त्वरितादेवीचे दर्शन सुध्दा घेणार आहेत अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेश अध्यक्षा तथा पं.स.सदस्य - पुजाताई मोरे यांनी दिली आहे. खा.छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकाला भेट द्यावी अशी विनंती तलवाडा येथील पत्रकारांनी पुजाताई मोरे यांच्याकडे केली होती. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे भोसले हे आज दुपारी अडीच वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकाला भेट देऊन त्यानंतर श्रीक्षेत्र त्वरितादेवीचे दर्शनासाठी जाणार आहेत. खा.छत्रपती संभाजीराजे भोसले अति पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी  तलवाडा परिसरात येणार असल्यामुळे पत्रकार बांधवांनी पुढाकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा परिसर साफसफाई करत टकाटक केला असून याकामी तीन जेसीबी मालक असलेले बाळू शिंदे, श्री पालवे व शेख लालाभाई आणि ट्रॅक्टर मालक ऋषी मरकड यांनी आपले मोलाचे योगदान देऊन चौकाची स्वच्छता करण्यासाठी निस्वार्थपणे सहकार्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात साफसफाई करण्यात आल्यामुळे लोकांनी समाधान व्यक्त करत या कामाचे कौतुक देखील केले आहे.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत 

____________

Also see : आ.दौलत दरोडांची संभाव्य गारगाई धरण प्रकल्प बाधीतांच्या पुनर्वसनाच्या /भात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना

https://www.theganimikava.com/Rehabilitation-of-potential-Gargai-dam-project-victims-of-MLA-Daulat-robberies--Instructions-for-Punchnama-of-Loss-of-Paddy-Crops