केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीची जाचक अधिसुचना तात्काळ मागे घ्यावी
आझाद हिंद संघटना पालघर जिल्ह्याच्या वतीने वाडा तहसिलदारांना दिले निवेदन.....

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीची जाचक अधिसुचना तात्काळ मागे घ्यावी
आझाद हिंद संघटना पालघर जिल्ह्याच्या वतीने वाडा तहसिलदारांना दिले निवेदन
भारत सरकारने (gov) सोमवार,दि.१४ सप्टेंबर रोजी काढलेली कांदा निर्यात बंदीची जाचक
अधिसुचना त्वरीत मागे घ्यावी अशी मागणी आझाद हिंद संघटनेच्या वतीने देशाचे पंतप्रधान यांना शुक्रवार ,दिनांक 18 सप्टेंबर रोजी वाडा तहसिलदार कार्यालयामार्फत दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
आझाद हिंद संघटना पालघर (palghar) जिल्हाच्या वतीने देशाचे पंतप्रधान यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,दि.१४ सप्टेंबर २०२० रोजी वाणिज्य मंत्रालय,भारत सरकार द्वारा सुचना क्रं.३१/२०१५-२० (Amendment In Export Of Onions) काढण्यात आली.सदरील अधिसुचने मध्ये तात्काळ कांदा निर्यात बंदी करण्यात यावी.ही जाचक सुचना देण्यात आली.या अनुषंगाने दि.१४ सप्टेंबर २०२० हा संबंध भारतातील कांदा उत्पादक शेतक-यांसाठी काळा दिवस ठरलाआहे.ढासळलेली अर्थव्यवस्था,कोरोना महामारी (corona) ,नेहमीचा दुष्काळ,अतिवृष्टी,नापिकी,बोगस बियाणे,कर्जबाजारीपणा,जी.एस.टी.,नोटाबंदी इत्यादी संकटांनी शेतकरी त्रासलेला आहे.त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत.भारता मध्ये शेतकरी कष्ट करून उत्पन्न घेतात,आज कसा तरी कांद्याला चांगला भाव मिळत आहे.परंतू,योग्य भाव शेतक-यांना मिळत असताना शासनाच्या या अन्यायकारक निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे.शेतक-यांचे मरण हेच केंद्र सरकारचं धोरण हे कांद्याची निर्यात बंदी करून केंद्र सरकारने (central gov) सिध्द केले आहे.हे सरकार शेतक-यांच्या जिवावर उठले आहे.त्याचा आझाद हिंद संघटना जाहिर तीव्र निषेध करीत आहे.
आज आझाद हिंद संघटना महाराष्ट्र (maharashtra) पालघर (palghar) जिल्ह्याच्या वतीने वाडा तहसीलदारांना केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या जाचक अधिसूचना तात्काळ मागे घेण्याबाबत निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी शेखर पवार, सत्यवान तरे, जितेश पाटील तसेच सदस्य जयेश घोडविंदे, अनिल पाटील,
शैलेश आंबवणे , सुंगन्धा पाटील, जानवी पाटील, मोनिका पवार , रेश्मा पवार उपस्थित होते
वाडा
प्रतिनिधी - जयेश घोडविंदे
_____
Also see : पूर्ण आसन क्षमतेने एसटी प्रवासास राज्य शासनाची परवानगी...
https://www.theganimikava.com/State-travel-permit-for-ST-travel-at-full-seating-capacity