दिल्ली हायकोर्टाने फेटाळली सुशांतच्या वडिलांची याचिका

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला 14 जून रोजी एक वर्ष पूर्ण होणार आहे.

दिल्ली हायकोर्टाने फेटाळली सुशांतच्या वडिलांची याचिका
Sushant Singh Rajput news

दिल्ली हायकोर्टाने फेटाळली सुशांतच्या वडिलांची याचिका

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत  याच्या मृत्यूला 14 जून रोजी एक वर्ष पूर्ण होणार आहे.

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूला 14 जून रोजी एक वर्ष पूर्ण होणार आहे. अशा परिस्थितीत, दिल्ली उच्च न्यायालयाने आता अभिनेत्याच्या जीवनावर आधारित ‘न्याय: द जस्टिस’या चित्रपटासंदर्भात मोठा निर्णय दिला आहे.(Delhi High Court rejects Sushant's father's petition against film)

बातमीनुसार अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी एक याचिका दाखल केली होती आणि या याचिकेत त्यांनी सुशांतच्या आयुष्यावर आधारित विविध प्रस्तावित प्रकल्पांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. या याचिकेत सुशांतचे वडील कृष्णा किशोर सिंह यांनी आपल्या मुलाचे नाव किंवा तत्सम पात्र असणाऱ्या चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती.


यासोबतच सुशांतच्या जीवनावर आधारित आगामी किंवा प्रस्तावित प्रकल्पांचा उल्लेख या याचिकेत करण्यात आला होता. ज्यात “सुसाईड ओर मर्डर : अ स्टार वॉज लॉस्ट”, ‘शशांक’ आणि एका निनावी चित्रपटाचा उल्लेख होता. अशा परिस्थितीत सुशांतच्या चाहत्यांना यामुळे मोठा धक्का बसू शकतो, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही, असेही यात म्हटले होते.


चित्रपटाच्या नावासह दिल्ली उच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात या कथेतही बदल करण्यात आला असल्याचे म्हटले आहे. आता या चित्रपटाचे नवीन शीर्षक आता ‘शशांक’ असे झाले आहे.अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचे वडील केके सिंह यांना वाटते की, त्यांचा मुलगा आणि कुटूंबाचे नाव बदनाम करण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. त्याच्यासोबत घडलेल्या घटनेचा फायदा घेऊन, त्यांच्या चित्रपटाचे मार्केटिंग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचे 14 जून 2020 रोजी मुंबईतील त्याच्या फ्लॅटमध्ये निधन झाले होते. अभिनेत्याने आत्महत्या केल्याचे कळताच त्याच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला होता. अभिनेत्याच्या मृत्यूच्या 1 महिन्यानंतर, कुटुंबियांनी पोलिसात गुन्हा दाखल केला होता आणि रिया चक्रवर्तीविरूद्ध तक्रार दाखल केली होती. 

एनसीबीच्या तपासणीत अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तुरूंगाची हवा देखील खाल्ली आहे. यासह आणखी बरीच मोठी नावे यात समोर आली होती, आता पुन्हा एकदा एनसीबी कारवाई करत आहे आणि नुकतीच सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठाणीला अटक देखील केली आहे.(Delhi High Court rejects Sushant's father's petition against film)

त्याच्या चौकशीच्या आधारे आता आणखी काही लोकांनाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.