सुरगाणा तालुका मुख्यध्यापक संघ कार्यकारिणी जाहीर....!!

सुरगाणा तालुक्यामध्ये मुख्यध्यापक संघ  कार्यकारणी निवड समारंभ उंबरपाडा येथे  पार पडला.....

सुरगाना तालुका मुख्यध्यापक संघ कार्यकारिणी जाहीर....!!

 सुरगाणा तालुक्यामध्ये मुख्यध्यापक संघ  कार्यकारणी निवड समारंभ उंबरपाडा (खो) येथे  पार पडला.सर्वप्रथम आदिवासी क्रान्तिवीर बिरसा मुंडा ,सरस्वती,यांच्या प्रतिमेचे द्विपपुजन करण्यात आले.

अनुदानित-विनाअनुदानित आश्रम शाळेतील गंभीर समश्याना समोर जावे लागते.बऱ्याच शाळेतील  शिक्षकांना ७ वेतन अजूनही लागू नाही? वेळेवर पगार मिळत नाही?

GP स्लिप पासून अजूनही शिक्षक वंचित आहेत. अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.यामुळे सर्व मुख्यध्यापक यांनी एकत्र येऊन सुरगाना तालुका मुख्यध्यापक संघ स्थापन करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रस्थाविक करताना बागुल सर म्हणाले कि,शाळेतील समस्यांचे निराकरन व्हावे म्हणून संघटनेची गरज आहे. या कार्यक्रमात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्यामध्ये  सेवानिवृत्त मुख्यध्यापक पी.पी.खैरनार(शिंदे.दिगर) , जाधव सर(अंबाठा),गावित सर,(हातरुंडी), मोरे सर (अलंगुन) ,अखिल विश्व गायत्री परिवाराने निवड केलेल्या "आदर्श शिक्षक पुरस्कर्ते", 
आदिवासी  संघटनेतील तालुकाध्यक्ष  अशोक भोये, हेमंत मोरे, मीडिया क्षेत्रातील सकाळ वृत्तपत्राचे रतन चौधरी सर, लोकमत,प्रबन्धभुमीचे आर.डी.भोये, या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रगती माध्य.विद्यालय उंबरपाडा(खो) शाळेतील खजिनदार पांडूरंग भोये यांची निवड करण्यात आली.याप्रसंगी नाशिक जिल्हा मुख्यध्यापक संघाचे एस.के.देशमुख, अध्यक्ष. एस.के.सावंत, उपाध्यक्ष. आर.के.सावंत, निफाड मुख्यध्यापक संघाचे  ढेमसे सर, सिन्नर मुख्यध्यापक संघाचे  महाले सर, देवळा मुख्यध्यापक संघाचे  डी. आर.आहेर,एम.के.आहेर, महा.राज्य."सीटू" चे राज्य सचिव राजेंद्र भामरे साहेब या कर्यक्रमाला  उपस्थित होते. यावेळीं सुरगाना तालुक्यातील सर्वच आश्रम शाळेतील मुख्यध्यापक ,शिक्षक कर्मचारी यांचादेखील सहभाग होता. कोरोना संक्रमन काळ असल्या कारनाने मास्क,सेनिटायझर, नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

 सुरगाणा
प्रतिनिधी - अशोक भोये

______

Also see : कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्याची राष्ट्रवादीची मागणी

https://www.theganimikava.com/NCP-demands-free-treatment-for-Corona-patients