सुप्रीम कोर्टानं फटकारल्या नंतर मोदी सरकारला अखेर जाग ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 वर्षावरील व्यक्तिंचं मोफत लसीकरण करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

सुप्रीम कोर्टानं फटकारल्या नंतर मोदी सरकारला अखेर जाग ?
Supreme Court news

सुप्रीम कोर्टानं फटकारल्या नंतर मोदी सरकारला अखेर जाग ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 वर्षावरील व्यक्तिंचं मोफत लसीकरण करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

लसीकरणाची सर्व जबाबदारी राज्याची नसून केंद्राची असणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. लसीकरणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात केंद्र सरकारला फटकारलं होतं. त्यामुळे मोदी सरकारने ही जबाबदारी घेतल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येतं.(Modi government finally wakes up after being hit by the Supreme Court)


सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, जस्टिस एल. एन. राव आणि जस्टिस एस. आर. भट्ट यांच्या खंडपीठाने सरकारला फटकारले होते. लसीकरणासाठी तुम्ही 35 हजार कोटींची तरतूद केली आहे. आतापर्यंत हा पैसा कुठे खर्च केला? असा सवाल करतानाच लसीकरणाच्या खर्चाचा तपशीलही कोर्टाने मोदी सरकारला मागितला होता. 


केंद्र सरकारने आज 18 वर्षावरील सर्वांचं मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचं आज जाहीर केलं आहे. मात्र, बुधवारी कोर्टाने 18 ते 44 वयोगटातील व्यक्तिंचं पेड व्हॅक्सिनेशन करण्याचा निर्णय मनमानी आणि तर्कहीन असल्याचं कोर्टाने म्हटलं होतं. ज्या कोविन APPवरून लसीकरण नोंदणी करणं बंधनकारक केलं जात आहे. त्या कोविन APP नेत्रहीन वापर कसा करतील? असा सवालही कोर्टाने विचारला होता.


व्हॅक्सिनेशनवरील सुनावणीवेळी केंद्र सरकारने सरकारच्या धोरणात कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही, असं म्हटलं होतं. त्यावरून कोर्टाने केंद्राला फटकारले. संविधानाने आमच्यावर जी जबाबदारी दिली आहे, त्याचं आम्ही पालन करत आहोत. कार्यपालिका लोकांच्या अधिकारांचं उल्लंघन करत असेल तर न्यायपालिका मूकदर्शक बनून राहू शकत नाही.


व्हॅक्सिनेशन निधीचा खर्च कसा केला?
किती लसी देण्यात आल्या? संपूर्ण लेखाजोखा द्या
व्हॅक्सिनचा लेखाजोखा द्या
उरलेल्या लोकांचं व्हॅक्सिनेशन कसं करणार?
मोफत लसीकरणाचे मापदंड काय आहेत?
पॉलिसीशी संबंधित कागदपत्रे आम्हाला द्या

कोरोनाच्या बदलत्या नेचरमुळे 18 ते 44 वयोगटातील लोकांचं लसीकरण करणं आवश्यक झालं आहे. ज्यांना प्राधान्याने लस देणं आवश्यक आहे. त्यांच्यासाठी वेगळं नियोजन करा.