ऊसतोड कामगारांना चोरट्या मार्गाने कारखानदारांनी घेऊन जाऊ नये अन्यथा आंदोलन तीव्र करणार - मोहन जाधव

ऊसतोडणी कामगारांना तोडणीदर ४०० रुपये करा, वाहतूक दर व मुकादमाच्या कमिशनमध्ये वाढ करा...

ऊसतोड कामगारांना चोरट्या मार्गाने कारखानदारांनी घेऊन जाऊ नये अन्यथा आंदोलन तीव्र करणार - मोहन जाधव
Sugarcane workers should not be smuggled by the manufacturers otherwise the agitation will intensify

ऊसतोड कामगारांना चोरट्या मार्गाने कारखानदारांनी घेऊन जाऊ नये अन्यथा आंदोलन तीव्र करणार - मोहन जाधव

सीटू ऊसतोडणी कामगार संघटनेच्या शाखा उद्घाटन प्रसंगी केले आवाहन

माजलगाव / तालखेड : ऊसतोडणी कामगारांना तोडणीदर ४०० रुपये करा, वाहतूक दर व मुकादमाच्या कमिशनमध्ये वाढ करावी. कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, विमा लागु करावा आणि दरवाढीचा करार तीन वर्षाचा करावा अशी मागणी तालखेड येळा तांडा येथे सीटू ऊसतोडणी कामगार संघटनेच्या शाखा उद्घाटन प्रसंगी मोहन जाधव आणि आबा राठोड यांनी यावेळी केले.

या शाखा उदघाटन कार्यक्रमास ऊसतोडणी कामगार संघटनेचे मोहन जाधव व आबा राठोड प्रमुख मार्गदर्शक तर विनायक चव्हाण, विजय राठोड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शाखा अध्यक्षपदी सुरेश राठोड, शाखा सचिवपदी राहुल राठोड, कोषाध्यक्षपदी सुनील राठोड तसेच उपाध्यक्ष म्हणून बाळू राठोड, अमोल जाधव, सहसचिव म्हणून नितीन राठोड, वैजनाथ राठोड, मार्गदर्शक म्हणून बाबुराव राठोड, विनायक राठोड, चेअरमन रोहिदास जाधव यांची निवड करण्यात आली. यासोबतच सदस्य म्हणून भारत राठोड, गोपीनाथ राठोड, शिवाजी जाधव, सुनील जाधव, विकास राठोड, दत्ता राठोड, युवराज राठोड, लहू राठोड, सुरेश जाधव, शिवाजी राठोड यांची निवड झाली। त्याबद्दल त्यांचे उपस्थितांनी लाल रुमाल गळ्यात टाकून स्वागत केले.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

_____