कोव्हीड काळात सर्व्हेक्षण करणारे विद्यार्थी मानधनापासून वंचित  

कोरोनाच्या पादूर्भावाने कल्याण डोंबिवली शहरातील करोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने महापालिकेमार्फत मोहीम राबवण्यात आली होती.

कोव्हीड काळात सर्व्हेक्षण करणारे विद्यार्थी मानधनापासून वंचित  

कल्याण (kalyan): कोरोनाच्या (corona) पादूर्भावाने कल्याण डोंबिवली शहरातील करोना (corona) बाधित रुग्णांची (patient) संख्या वाढू लागल्याने महापालिकेमार्फत कोव्हीडच्या (covid) संशयित रुग्णांना शोध  सर्वेक्षण घेण्यासाठी मोहीम राबवण्यात आली होती. या कामासाठी खाजगी ठेकेदाराकडून कोव्हीड रुग्णांच्या सर्वेक्षणाचे काम कारून घेण्यात आले होते. सर्व्हेक्षणासाठी खाजगी ठेकेदाराकडे सर्व्हेक्षणाचे काम करणाऱ्या कॉलेजच्या २६ विद्यार्थ्यांना महिनाभर राबवून त्यांना मानधनापासून वंचित ठेवल्याने अखेरीस सर्व्हेक्षण करणाऱ्या या कॉलेज विद्यार्थ्यांनी आपल्या हक्काच्या मानधनासाठी पालिकेच्या मुख्यालयावर धाव घेत आपले थकीत मानधन देण्याची मागणी केली.

     कल्याण (kalyan) डोंबिवली महानगर पालिकेत कोरोनाच्या (corona) पादुर्भावाने मे जून महिन्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या  झपाट्याने वाढू लागल्याने त्या परिसरातील संशयित रुग्णांचा शोध घेण्यासाठी महापालिकेने सर्वेक्षण मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी महापालिका (Municipal Corporation) प्रशासनाकडे आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याने पालिका प्रशासनाने सर्व्हेशनाच्या कामासाठी ठेकेदार नेमण्यासाठी ऑन लाईन जाहिरात देण्यात आली होती. कोव्हीडचे (covid) संशयित रुग्ण तपासणी महिलेच्या सर्व्हेक्षणासाठी ठेकेदार नेमण्यात आले व त्याच्या कडून सर्व्हेक्षणाचे काम करण्यात आले.

या तरुणाना सर्वेक्षणासाठी ३५० रुपये देण्यात येणार असल्याचे सांगितले मात्र काम पूर्ण केल्यानंतर दोघांच्या जोडीला मिळून ३५०  रुपये देणार असल्याचे सांगितले. मात्र अद्याप ते ही देण्यात आले नसल्याचे सांगितले. कोरोना (corona) काळात विविध सुविधांसाठी पालिकेने आता पर्यंत ३५ कोटी खर्च केला मात्र जीव धोक्यात घालून सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र अद्याप मानधन न मिळाल्याने नेमका निधी कुठे खर्च केला याबाबत प्रश्न  उपस्थित झाले आहे.

तर याबाबत पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी अश्विनी पाटील यांनी सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या तरुणांना त्याचे मानधन देणार आहोत काही तांत्रिक अडचणींमुळे विलंब झाला असला तरी सदर रक्कम त्याच्या थेट खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले.

कल्याण
प्रतिनिधी-कुणाल म्हात्रे

_______

Also see:कल्याण डोंबिवली कोरोना प्रभाव

https://www.theganimikava.com/kalyan-dombivali-corona-effect-1043