हिरो फायनान्स कंपणी कडून कर्जदारांची पिळवणूक थांबवा -विजय गायकवाड
जिल्ह्यात बीड तालुक्यातील अनेक वाहनधारक घर खरेदी विक्री तसेच वैयक्तिक कर्जदारांना हिरो फायनान्स बीड ही कर्ज देते परंतु मार्च महिन्यापासून कोरोना महामारी आजारामुळे सबंध भारत देशासह बीड जिल्हा ताळेबंद होता...

हिरो फायनान्स कंपणी कडून कर्जदारांची पिळवणूक थांबवा-विजय गायकवाड
बीड : जिल्ह्यात बीड तालुक्यातील अनेक वाहनधारक घर खरेदी विक्री तसेच वैयक्तिक कर्जदारांना हिरो फायनान्स बीड ही कर्ज देते परंतु मार्च महिन्यापासून कोरोना महामारी आजारामुळे सबंध भारत देशासह बीड जिल्हा ताळेबंद होता. या मध्ये अनेक कामगारांचे हात बंद असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली होती त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्याकडे जगण्या पुरता ही पैसा शिल्लक राहिलेल्या नव्हता यामध्येच हिरो फायनान्स बीड हे वसुलीच्या नावाखाली कर्जदारांना वसुलीसाठी तगादा लावत असून त्यांना वेठीस धरण्याचे काम करत असल्याचा आरोप जनप्रहार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विजय गायकवाड यांनी केला आहे हिरो फायनान्स तसेच बीड जिल्ह्यातील इतर शासकीय निमशासकीय बँकांनी कर्जदारांना वसुलीसाठी तगादा लावू नये व त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करू नये अन्यथा जनप्रहार सामाजिक संघटनेच्या वतीने फायनान्स कंपनी तसेच बँकांच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी जनप्रहार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विजय गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कळवले आहे.
बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत
__________
Also see : सेंट थॉमसशाळेची पालकांना फी भरण्यासाठी सक्ती
https://www.theganimikava.com/St-Thomas-School-forces-parents-to-pay-fees