नवी मुंबईतील ग्रंथालये उघडण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभागाच्या वतीने आयुक्तांना निवेदन
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळेच व्यवसाय व व्यवहार ठप्प झाले होते. आत्ता कुठे सर्व हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे

नवी मुंबईतील ग्रंथालये उघडण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभागाच्या वतीने आयुक्तांना निवेदन
कोरोनाच्या (corona) प्रादुर्भावामुळे सगळेच व्यवसाय व व्यवहार ठप्प झाले होते. आत्ता कुठे सर्व हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. गर्दी होईल असे ठिकाण सरकारने (government) आजही बंदच ठेवले आहेत. यामध्ये सर्व उद्योगांचे अतोनात नुकसान झाले आहे. यासर्व उद्योग व व्यवसाय क्षेत्राबद्दल सर्वच बोलताना दिसत आहेत. परंतु जिथे बसून विद्यार्थी वाचन करतात अश्या सार्वजनिक वाचनालयाबाबत कोणीही बोलताना दिसत नाही हीच बाब लक्षात घेऊन व ग्रंथालयांना आज ज्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यावर शासनाने तात्काळ मार्ग काढावा व वाचनालये लवकरात सुरू करावी. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (Congress) पार्टी (ग्रंथालय विभाग) तर्फे नवीमुंबई (navi mumbai) महानगरपालिका आयुक्त (Municipal Commissioner) मा. श्री. अभिजित बांगर साहेब यांना भेटून निवेदन देण्यात आले. ग्रंथालयाच्या (library) समस्या आणि स्पर्धा परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना ( students) त्याचा होणारा फायदा याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी ग्रंथालय (library) विभागाचे प्रदेश सदस्य डॉ. मोहन पाखरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभागाच्या नवी मुंबई (Nationalist Congress Party Library department navi mumbai) जिल्हाध्यक्षा वंदना आरकडे (हिरवे), जिल्हा उपाध्यक्ष सावित्री पाटील, बेलापूर विधानसभा उपाध्यक्ष श्री. राजू आरकडे पदाधिकारी उपस्थित होते
नवी मुंबई
प्रतिनिधी - अनिल भास्करराव काकडे
______
Also see : सोनेरी स्वराज्याची घडण.....
https://www.theganimikava.com/initiation-of-hindavi--swarajya