अपहृत वकिलाच्या शीघ्र तपासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे पोलिस आयुक्तांना  निवेदन 

अपहृत वकिलाच्या शीघ्र तपासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे पोलिस आयुक्तांना  लेखी निवेदन दिले...

अपहृत वकिलाच्या शीघ्र तपासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे पोलिस आयुक्तांना  निवेदन 
Statement to the Commissioner of Police of the Nationalist Congress Legal Cell for speedy investigation of the abducted lawyer
अपहृत वकिलाच्या शीघ्र तपासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे पोलिस आयुक्तांना  निवेदन 

अपहृत वकिलाच्या शीघ्र तपासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे पोलिस आयुक्तांना  निवेदन 


पुणे (Pune): ॲड.उमेश चंद्रशेखर मोरे या अपहृत वकिलाचा तपास शीघ्र गतीने करण्यात यावा या मागणीसाठी  राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे  पुणे शहर अध्यक्ष ॲड.लक्ष्मण राणे, प्रदेश सरचिटणीस ॲड.पंडितराव कापरे, प्रदेश चिटणीस ॲड.समीर शेख आणि जेष्ठ वकील ॲड.सुभाष गायकवाड यांनी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन दिले.या तपासासाठी पोलिसांची टीम बनवून तातडीने शोध कार्य करण्याचे आदेश अमिताभ गुप्ता यांनी दिले.    

ॲड.उमेश चंद्रशेखर मोरे पुणे जिल्हा न्यायालय, पुणे परिसरातून दि १ ऑकटोबर  पासून बेपत्ता झालेले आहेत .अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केलेले असावे, असे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यांचे बंधू प्रशांत मोरे  यांनी शिवाजी नगर पोलिस स्टेशन येथे तशी तक्रार दाखल केलेली आहे. तथापि बारा दिवस झाले तरी अद्याप ॲड. उमेश  मोरे यांचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यांची गाडी शिवाजीनगर कोर्ट परिसर मध्ये आढळली  आहे. त्यांची पत्नी, वृद्ध आई- वडील, भाऊ सर्व चिंतेत आहेत.

भर दिवसा त्यांचे कोर्ट परिसरातून बेपत्ता होणे वकिलांचे दृष्टीने अत्यंत चिंतेची व गंभीर  बाब झालेली आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेल, पुणे शहर तर्फे अध्यक्ष अँड लक्ष्मण राणे, प्रदेश सरचिटणीस अँड पंडितराव कापरे, प्रदेश चिटणीस अँड समीर शेख आणि जेष्ठ वकील अँड सुभाष गायकवाड यांनी सोमवारी दुपारी  दुपारी पुणे  पोलीस आयुक्त   यांची  भेट घेऊन ही  बाब त्यांचे निदर्शनास आणली व त्यांना जलद तपासाची  विनंती केली. तसे लेखी निवेदन दिले.

पुणे
प्रतिनिधी - अशोक तिडके 

_________

Also see : विविध उपक्रमांनी लायन्स क्लब गणेशखिंडचा सेवा सप्ताह संपन्न...

https://www.theganimikava.com/Service-week-of-Lions-Club-Ganeshkhind-concluded-with-various-activities