अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून मदतनिधी
बळीराजा सुखावणार पालघर जिल्ह्यातील २७ हजार ३८२ शेतकऱ्यांना १२ कोटी ५३ लाख ९० हजार रुपये नुकसान भरपाई
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून मदतनिधी
बळीराजा सुखावणार पालघर जिल्ह्यातील २७ हजार ३८२ शेतकऱ्यांना १२ कोटी ५३ लाख ९० हजार रुपये नुकसान भरपाई
मागील वर्षी जुलै आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे पालघर जिल्ह्यात शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदत जाहीर केली असून लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे येथील बळीराजा या निर्णयामुळे सुखावला असून खुश होऊन राज्य सरकारचे आभार व्यक्त करीत आहे.
पालघर जिल्ह्याचा तलासरी तालुका सोडून इतर तालुक्यांमध्ये गेल्या वर्षी २६ जुलै व त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते. याचा मोठा फटका येथील शेतकऱ्यांना बसला होता. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यात आले होते. तसा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार राज्य शासनाने मागील सप्टेंबर २०१९ ला शेती पिकांचे नुकसान झालेल्या पालघर जिल्ह्यातील २७ हजार ३८२ शेतकऱ्यांना १२ कोटी ५३ लाख ९० हजार रुपये मदतनिधी राज्य शासनाकडून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या शेतकऱ्यांचे ३३ टक्के पेक्षा जास्त शेती पिकांची नुकसान झालेली आहे. अशा शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या जमीन क्षेत्रानुसार मदत जाहीर झालेली आहे. ही मदत एक हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत, नुकसान झालेल्या जमीन क्षेत्रानुसार किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना लागू होणार आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीनुसार या पिकांसाठी व क्षेत्रासाठी जी मदत ठरवली आहे. त्या ठरवलेल्या मदतीच्या तिपटीने हा मदत निधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून प्रतिहेक्टरी सुमारे ६ हजार ८०० रुपये इतकी नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. परंतु ही नुकसान भरपाई ठरलेल्या दराच्या तिप्पट शेतकऱ्यांना मिळणार असून ही मदत दोन टप्प्यात विभागणी करून शेतकऱ्यांच्या थेट खात्यात देण्यात येणार आहे.
पालघर जिल्ह्यासाठी मंजूर झालेली नुकसान भरपाईची मदतनिधी १२ कोटी ५३ लाख ९० हजार शासनाकडून प्राप्त होणार असून ती जिल्ह्यातील २७ हजार ३८२ शेतकऱ्यांना मिळणार आहे. सप्टेंबर महिन्यात या निधीचा पहिला हप्ता तर ऑक्टोबर महिन्यात दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. ही प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसीलदार कार्यालयाकडून राबविण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात ४ कोटी १७ लाख ९७ हजार तर दुसऱ्या टप्प्यात ८ कोटी ३५ लाख ९३ हजार अशी एकूण १२ कोटी ५३ लाख ९० हजार नुकसान भरपाईची निधी राज्य शासनाकडून प्राप्त होणार आहे. हा निधी प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पडताळणी करून तात्काळ वर्ग करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.
पालघर
प्रतिनिधी - राजेंद्र पाटील
_________
Also see : ओला दुष्काळ जाहीर करा, जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन !
https://www.theganimikava.com/Declare-a-wet-drought-Statement-given-to-the-Collector