श्री स्वामी समर्थ मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालयाची मान्यता रद्द
ज्यादा बिल आकारणाऱ्या २२ खाजगी रुग्णालयावर केडीएमसीची कारवाई

श्री स्वामी समर्थ मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालयाची मान्यता रद्द
ज्यादा बिल आकारणाऱ्या २२ खाजगी रुग्णालयावर केडीएमसीची कारवाई
आतापर्यंत ३४ लाखांची वसुली
कल्याण (kalyan) : कोरोना (corona) रुग्णांकडून ज्यादा बिल आकारणाऱ्या २२ रूग्णालयांवर आतापर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कारवाई केली असून या कारवाईत तब्बल ३४ लाखाची वसुली करत संबंधित रुग्णांना (patient) परत केली आहे. शुक्रवारी डोंबिवली पूर्वेकतील श्री स्वामी समर्थ मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालयावर (hospital) जादा बिल आकरणी केल्याबद्दल महापालिकेने कारवाई करत स्वामी समर्थ मल्टी स्पेशालिस्ट रुग्णलयाची मान्यता रद्द केली आहे.
सर्वसामान्य कोविड (cover) रूग्णांची आर्थिक फसवणुक केल्याचे आढळुन आल्याने या रूग्णालयास कोविड रूग्णालय (covid hospital) म्हणुन घोषित केलेले आदेश रद्द करत तसेच या रूग्णालयाची ३० सप्टेंबर २०२० किंवा उपरोक्त अनियमितता दूर करुन रक्कम परत करणे यापैकी जे नंतर घडेल तोपर्यंत निलंबित करण्याचा आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, यांनी दिलें आहेत. तसेच रुग्णालयातील सर्व रुग्ण डिस्चार्ज होईपर्यंत परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (municipal corporation) वतीने वैद्यकीय अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कल्याण, ठाणे
प्रतिनिधी- कुणाल म्हात्रे
_______
Also see : नवी मुंबईतील ग्रंथालये उघडण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभागाच्या वतीने आयुक्तांना निवेदन