धक्कादायक! पुण्यात पोलीस मुख्यालयात गोळीबार; मानसिक तणावातून कर्मचाऱ्यांने स्वतः वर झाडली गोळी

  पुण्यातील शिवाजीनगर मुख्यालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिवाजीनगर मुख्यालयात ड्युटीवर असताना महिला कर्मचाऱ्याशी वाद झाल्यानंतर मानसिक तणावातून कर्मचाऱ्यांने स्वतः वर गोळी झाडून घेण्याचा प्रयत्न केला...

धक्कादायक! पुण्यात पोलीस मुख्यालयात गोळीबार; मानसिक तणावातून कर्मचाऱ्यांने स्वतः वर झाडली गोळी
Shocking! Shooting at police headquarters in Pune; The employee shot himself in the head due to mental stress

धक्कादायक! पुण्यात पोलीस मुख्यालयात गोळीबार; मानसिक तणावातून कर्मचाऱ्यांने स्वतः वर झाडली गोळी

पुणे पिंपरी :  पुण्यातील शिवाजीनगर मुख्यालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिवाजीनगर मुख्यालयात ड्युटीवर असताना महिला कर्मचाऱ्याशी वाद झाल्यानंतर मानसिक तणावातून कर्मचाऱ्यांने स्वतः वर गोळी झाडून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला गोळी लागल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी आज पहाटे ही घडली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तर या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

असा घडला प्रकार

शिवाजीनगर मुख्यालय येथे क्वार्टर गेट येथे ते सस्ते आणि एक महिला कर्मचारी रात्रपाळीस ड्युटीवर होते. त्यावेळी सस्ते आणि महिला कर्मचारी यांच्यात वाद झाले. वादात सस्ते याना मानसिक ताण आल्यामुळे त्यांनी स्वतःवर गोळी गोळी झाडून घेण्याचा प्रयत्न केला.पोलीस कॉन्स्टेबल बेंडाळे असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पोलीस शिपाई बेंडाळे आणि सस्ते शिवाजीनगर मुख्यालयात नेमणुकीस आहेत.

दरम्यान हा प्रकार लक्षात येताच बेंडाळे यांनी त्यांना अडविले. अडवत असताना गोळी बेंडाळे याना लागली आहे. यात बेंडाळे जखमी झाले असून, त्यांना ससून रुग्णालयात नेण्यात आले आहे. नेमकी गोळी स्वतःवर झाडून घेण्याचा प्रयत्न का केला, याचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे सांगितले जात आहे.


पिंपरी , पुणे

प्रतिनिधी - आत्माराम काळे

_________

Also see :  चांदवड:महाराष्ट्र राज्य छावा युवा विद्यार्थी संघटना कृती समिती तर्फे तीसगावात करण्यात आली सॅनिटाइजर फवारणी.

https://www.theganimikava.com/Chandwad-Sanitizer-spray-was-carried-out-in-Teesgaon-by-Maharashtra-State-Chhawa-Youth-Students-Association-Action-Committee