वाडा नगरपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व

उपनगराध्यक्षपदी वर्षा ताई गोळे यांची बिनविरोध निवड

वाडा नगरपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व
Shiv Sena dominates Wada Nagar Panchayat

वाडा नगरपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व 

 उपनगराध्यक्षपदी वर्षा ताई गोळे यांची बिनविरोध निव

 वाडा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाची आज निवडणूक बिनविरोध पार पडली. शिवसेनेच्या वर्षा गोळे यांची यावेळी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी रिताली परदेशी यांनी जाहीर केले.

उपनगराध्यक्ष पदासाठी नगरपंचायतमध्ये वाडा नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदाची साठी भाजपा तर्फ रीमाताई हर्षद गंधे आणि रामचंद्र जगन भोईर यांनी तर शिवसेने कडुन गटनेते संदीप गणोरे आणि वर्षाताई गोले यांनी फॉर्म भरले होते.नगरपंचायतीमधील विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने जोरदार तयारी करुन या निवडणुकीत उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता. मात्र ऐनवेळी महाविकास आघाडीमधील सर्व नगरसेवक एकत्र आल्याने भाजपाच्या उमेदवार रिमा गंधे यांनी अर्ज मागे घेतला. व आघाडीमधील शिवसेनेच्या वर्षा गोळे ह्या बिनविरोध निवडून आल्या.


वाडा नगरपंचायत मध्ये एकुण 17 सदस्य संख्या असुन शिवसेना (6) (shivsena), भाजपा (6) (bjp), काॅंग्रेस (2) (congress), राष्ट्रवादी काॅग्रेस, आर.पी.आय. व बहुजन विकास आघाडी यांचे प्रत्येकी एक सदस्य संख्या आहे. नगराध्यक्षा पदी  गितांजली कोलेकर ह्या शिवसेनेच्या असुन त्या जनतेमधून निवडून आलेल्या आहेत.तर आता  उपनगराध्यक्षपदी वर्षा ताई गोळे यांची निवड झाली आहे.

 वाडा
प्रतिनिधी-जयेश घोडविंदे

________

Also see :भाजपा शिक्षक आघाडीची कल्याण पूर्व कार्यकारणी जाहीर

https://www.theganimikava.com/BJP-teachers-alliances-welfare-executive-announced