शिवसेनेचे नगरविकास मंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे लवकर बरे होण्यासाठी शिवसेनेतर्फे महाआरती
राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री सप्तशृंग निवासिनी देवी संस्थान साठी पाच विश्वस्तांची निवड जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी केले आहे....
शिवसेनेचे नगरविकास मंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे लवकर बरे होण्यासाठी शिवसेनेतर्फे महाआरती
कल्याण : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकनाथ शिंदे लवकर बरे व्हावे यासाठी शिवसैनिक ठिकठिकाणी धार्मिक विधी आणि कार्यक्रम आयोजित करत आहेत. कल्याण पश्चिमेतील शिवसेना बिर्ला कॉलेज विभागीय शाखेतर्फे आज सायंकाळी हनुमान मंदिरात 'महाआरती' करण्यात आली. ज्यामध्ये बिर्ला कॉलेज शिवसेना शाखा परिसरातील अनेक शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. एकनाथ शिंदे यांची प्रकृती स्थिर असून ते लवकरात लवकर पुन्हा महाराष्ट्राच्या सेवेत रुजू व्हावे या विचाराने ही महाआरती करण्यात आल्याची माहिती आयोजक आणि शिवसेनेचे उपशहार प्रमुख रवी पाटील यांनी दिली.
कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे
________
Also see : पोलीस आणि सफाई कामगारांना स्टीमरचे वितरण
https://www.theganimikava.com/Distribution-of-steamers-to-police-and-cleaners