तरुणाची हत्या करून फरार झालेल्या इसमाला शहापूर पोलिसांनी केली अटक
उत्तरप्रदेश मध्ये एका तरुणाची हत्या करून फरार झालेल्या गुन्हेगाराच्या शहापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

तरुणाची हत्या करून फरार झालेल्या इसमाला शहापूर पोलिसांनी केली अटक
उत्तरप्रदेश (uttar pradesh) मध्ये एका तरुणाची हत्या करून फरार झालेल्या गुन्हेगाराच्या शहापूर (shahapur) पोलिसांनी मुसक्या आवळल्याआहेत. अमितचंद्र उर्फ रोशन बिंद असे आरोपीचे नाव असून त्याला युपी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तालुक्यातील खर्डीजवळ बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या एका २५ वर्षीय तरुणाला उपचारासाठी प्रथम खर्डी ग्रामीण रुग्णालय नंतर शहापूर उपजिल्हारुग्णालय व तेथून ठाणे येथे हलविण्यात आले होते. ठाणे (thane) येथे त्याची प्रकृती व्यवस्थित झाल्याने त्याला पुन्हा शहापूर येथे पाठविण्यात आले. या दरम्यान त्या तरुणाची चौकशी केली मात्र त्याने काहीच माहिती दिली नाही. त्याच्या जवळ असलेल्या बॅग ची तपासणी केली असता त्यामध्ये त्याचे आधारकार्ड (aadhar card) मिळाले. त्यावर असलेल्या पत्त्या वरून युपी मधील जमानिया या संबंधित पोलीस ठाण्यात फोन केला असता गंभीर माहिती पुढे आली.
उत्तरप्रदेश मधील गझिपुर जिल्ह्यातील कसेरापोखरा येथील अमितचंद्र बिंद या २५ वर्षीय तरुणाने त्याच गावातील एका तरुणाची हत्या करून फरार झाला होता. देशी दारूच्या दुकानात फुकट दारू न देणाऱ्या तरुणाची हत्या केली असल्याची माहिती युपी पोलिसांनी दिली. ठाणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार रकमजी व पथकाने तपास केला असल्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांनी सांगितले. हत्या करणारा गुन्हेगार अमितचंद्र बिंद याला युपी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
शहापूर
प्रतिनिधी -शेखर पवार
____
Also see: पालघर पोलिसांनी केली दोन गांजा विक्री करणाऱ्यांना अटक
https://www.theganimikava.com/palghar-police-arrest-two-cannabis-sellers