कल्याणात सेना भाजपला खिंडार; युवा कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

कल्याणमध्ये शिवसेना भाजपाला खिंडार पडली असून युवा सेना आणि भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे....

कल्याणात सेना भाजपला खिंडार; युवा कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
Sena cracks BJP in Kalyan; Admission of young activists in MNS
कल्याणात सेना भाजपला खिंडार; युवा कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

कल्याणात सेना भाजपला खिंडार; युवा कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

कल्याण (kalyan)  : कल्याणमध्ये शिवसेना (shivsena) भाजपाला (bjp) खिंडार पडली असून युवा सेना आणि भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कल्याण मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

राज्यात सुरू असलेल्या शिवसेना (shivsena) भाजपच्या (bjp) सत्ता संघर्षाला कंटाळलेल्या युवा नेतृत्वाने पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या मनसेला पंसती दिली आहे. माजी आमदार प्रकाश भोईर आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख वैभव किणी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे कल्याण शहर अध्यक्ष विनोद केणे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेचे विभाग अधिकारी पियुष चौधरी व भाजप (bjp) विद्यार्थी आघडीचे पदाधिकरी सदानंद टावरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मनविसेत प्रवेश करत मनसेचा झेंडा हाती घेतला.

शिवसेना भाजपच्या (bjp) शेकडो युवा कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा खांद्यावर घेतल्याने कल्याण डोंबिवली मनसेत नवचैतन्य निर्माण झाले असून सेना भाजपला (bjp) ऐन निवडणुकीच्या तोंडावर भगदाड पडल्याची चर्चा शहरात रंगली आहे. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई, शहर सचिव महेश मोरे, शहर उपाध्यक्ष सचिन पौपलाईटकर, विभाग अध्यक्ष सचिन शिंदे, रूपेश पाटील, विराज चौधरी, मनविसे शहर सचिव रोहित भोईर, सहसचिव गणेश नाईक, विभाग अध्यक्ष हर्ष गांगुर्डे, राहूल टेमघेरे, उपविभाग अध्यक्ष अभिजीत सोनाळकर, शैलेश भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कल्याण , ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे

______

Also see : नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त कल्याण मध्ये स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण

https://www.theganimikava.com/Sanitation-campaign-and-tree-planting-in-Kalyan-on-the-occasion-of-Narendra-Modis-birthday