महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सद्स्य पदी प्रमोद पाटील यांची निवड

महाराष्ट्र (maharashtra) राज्य शारीरिक शिक्षण (Physical education) व क्रीडा शिक्षक महासंघ अहमदनगर येथील अभिनव विद्यालयाचे शिक्षक प्रमोद पाटील यांची निवड झाली आहे.

महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सद्स्य पदी प्रमोद पाटील यांची निवड
Selection of Pramod Patil as a member of Maharashtra State Core Committee

महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सद्स्य पदी प्रमोद पाटील यांची निवड

       

महाराष्ट्र (maharashtra) राज्य शारीरिक शिक्षण (Physical education) व क्रीडा शिक्षक महासंघ अहमदनगर च्या राज्य कोअर कमिटी सदस्य पदी पालघर जिल्ह्यातील विराथन येथील अभिनव विद्यालयाचे शिक्षक प्रमोद पाटील यांची निवड झाली आहे. राज्य कोअर कमिटीची फेररचना नुकतीच शिक्षकदिनी संघटनेचे राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासंघाच्या बैठकीत करण्यात आली. 
       

गेल्या काही वर्षांपासून शालेय शिक्षणात शारीरिक शिक्षण(Physical education) व आरोग्य शिक्षणाच्या संदर्भात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणींवर मात करण्यासाठी, संघटनेचे काम करताना, धोरणात्मक निर्णय घेताना, निर्णयाची अंमलबजावणी करताना विचारांचे आदान-प्रदान व्हावे व विचार प्रक्रियेतून एकमेकांच्या सूचनांचा विचार करून आश्वासक पावले शारीरिक शिक्षण(Physical education) व क्रीडा क्षेत्रासाठी उचलता यावीत म्हणून कोर कमिटी ही अत्यंत महत्त्वाची आहे. कोअर कमिटीच्या निर्णयांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
     

पालघर (paghar) जिल्ह्यातून प्रमोद पाटील यांची कोअर कमिटीवर निवड झाली असून पाटील हे पालघर तालुका शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष तर  पालघर जिल्हा शारीरिक शिक्षण संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. तसेच ते अनेक संघटनांशी निगडित असून राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी आहेत. त्यांच्या निवडीमुळे सोशल मीडियावर त्यांचे मोठ्या प्रमाणात अभिनंदन होत आहे.

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

______

Also see: भारतरत्न प्रणव मुखर्जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली...

https://www.theganimikava.com/A-heartfelt-tribute-to-Bharat-Ratna-Pranav-Mukherjee