पोलीस , पत्रकार, डॉक्टर, परिसेविकांच्या मागण्यांसाठी सत्याग्रह आंदोलन चालू ...
मागण्या मान्य नाही झाल्यातर आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांच्या घरासमोर आंदोलन करणार ....
पोलीस , पत्रकार, डॉक्टर, परिसेविकांच्या मागण्यांसाठी सत्याग्रह आंदोलन चालू ...
मागण्या मान्य नाही झाल्यातर आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांच्या घरासमोर आंदोलन करणार .
डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर , शेख युनूसभाई च-हाटाकर
जिल्हाधिकारी कार्यालय समोर सत्याग्रह आंदोलन चालू
पोलिसांना कोरोना योद्धा मान्यता देऊन कोरोना मुळे मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लक्ष रूपये सानुग्रह सहाय्य अनुदानासाठी नव्याने लादलेल्या अटी व शर्ती उदाहरणार्थ मयत पोलिसांना मृत्यूपुर्वी किंवा उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्यापुर्वी १४ दिवसाच्या कालावधीत कोविड-१९ प्रतिबंधक कामी तैनात करण्यात आल्याच्या प्रमाणपत्राची मागणी करण्यात आली आहे ही मागणी पोलिसांचे मनोधैर्य खच्चीकरण करणारी असल्याने तात्काळ रद्द करण्यात यावी
२) उत्तर प्रदेश सरकारने पत्रकारांना दरवर्षी ५ लाख रुपये विमाकवच व कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे, मग महाराष्ट्र सरकार मदत करण्यासाठी तयार का नाही, पत्रकारांच्या कुटुंबियां प्रति संवेदनाहीनता का?? दुजाभाव का???
३) अंबेजोगाई येथील वृद्धत्व, आरोग्य व मानसिक आजार केंद्र आणि स्त्री रूग्णालयातील नियुक्ती असलेल्या ३६ डॉक्टरांना, परिसेवकांना वर्षभरापासून वेतन देण्यात का आले नाही तसेच ना, धनंजय मुंडे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांनी १५ दिवसापूर्वी लवकरच वेतन देण्यात येईल असे जाहीर करून सुद्धा अद्याप देण्यात आली नाही, ते तात्काळ देण्यात यावी, न देण्यामागे शासनाचे धोरण काय याची सत्यता जाणून घेण्यासाठी
४) ना . धनंजय मुंडे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांनी २७ फेब्रुवारी २०१९ रोजी मुख्य निवडणूक आयुक्त, तसेच मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांना पुराव्यानिशी लेखी तक्रार दाखल करताना डॉ, अशोक थोरात जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय बीड हे अवैध गर्भपातातील आरोपी आहेत, त्यांना अटक करण्यात आली होती, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल आहेत, ते उच्च व सर्वोच्च न्यायालयाने आरोप कायम केलेले आहेत, त्यांनी शासकीय सेवेत असताना केज तालुक्यातील तांबवा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली होती, तसेच २० वर्षापासून बीड जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय सहभाग आहे, त्यांनी सत्ताधारी पक्षाचे काम करत आहेत त्यामुळे त्यांची बीड जिल्ह्याबाहेर तात्काळ बदली करून प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती, आज मात्र ना, धनंजय मुंडे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड असताना आरोग्य विभागाला मिळालेल्या ३३ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रकरणात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून त्याची उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटी गठीत करून चौकशी करण्यात यावी यासाठी वारंवार निवेदन देण्यात आले आहे परंतु पालकमंत्री मुंडे यांनी घुमजाव का केले आहे, हे सत्य जाणून घेण्यासाठी सत्याग्रह आंदोलन करत आहोत,
पोलीस प्रशासन आणि पत्रकार यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर दि, १९ ऑक्टोबर रोजी ना, राजेशजी टोपे, आरोग्य मंत्री यांच्या जालना येथील निवासस्थानी लाक्षणिक उपोषण करण्याचा ईशारा डॉ, गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते तथा शेख युनूसभाई च-हाटाकर सामाजिक कार्यकर्ते तथा नेते वंचित बहुजन आघाडी बीड यांनी सरकारला दिला आहे.
बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत
__________
Also see : शैक्षणिक मिशन, संपूर्ण केंद्राला शिंदे येथे बुक डोनेटसह साहित्य वाटप