सातपाटी पोलिसांची कारवाई, दोन दुचाकी चोरांना अटक

पालघर तालुक्यातील सागरी पोलीस ठाणे सातपाटी हद्दीत दिवसेंदिवस दुचाकी चोरांचा वावर मोठ्याप्रमाणात वाढला होता.....

सातपाटी पोलिसांची कारवाई, दोन दुचाकी चोरांना अटक
Satpati police arrest two bike thieves

सातपाटी पोलिसांची कारवाई, दोन दुचाकी चोरांना अटक

     

पालघर (palghar) तालुक्यातील सागरी पोलीस ठाणे सातपाटी हद्दीत दिवसेंदिवस दुचाकी चोरांचा वावर मोठ्याप्रमाणात वाढला होता. यासाठी सातपाटी पोलिस ठाणे हद्दीत होणाऱ्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्याकरीता सातपाटी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी तपासा करिता कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार केले होते. या पथकाकडून ९ सप्टेंबर रोजी दोन संशयित इसमाना संध्याकाळी ४ ते ५:३० वाजल्याच्या सुमारास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. यामध्ये अक्षय उर्फ लाल्या किशोरबाबू शेळके (२२), सातपटी (देऊलपाडा) तर साईराज उर्फ संतोष मनोज कांबळी (२०) फ्लॅट नं. ३०६, कामधेनू अपार्टमेंट, विरार(पूर्व) या दोघांना अटक करून चैकशी केली असता त्यांनी चार गुन्ह्याची कबुली दिली आहे. यामध्ये सातपाटी पोलीस ठाण्यातील ४८/२०२० भा.द.वि.सं. कलम ३७९ व ३४ अन्वये रक्कम रुपये ७० हजार, तर विरार पोलीस ठाण्यातील ७२५/२०२० व ६७६/२०२० भा.द.वि.सं. कलम ३७९ अन्वये रक्कम रुपये ३० व ४५ हजार अशी असून एक ऑनलाईन तक्रारी अर्ज आहे. सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी पालघर विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक उमेश रोठे, पो.ना. भारत सानप, सौदागर रगडे, पो.शि. विशाल कांबळे, सागर राऊत, गणेश व्हसकोटी, दत्ता पगार यांनी केले आहे.

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील  

______

Also see : वीजबिल कमी करण्यासाठी शिवसेनेची महावितरण कार्यालयावर धडक

https://www.theganimikava.com/Shivsena-hits-MSEDCL-office-to-reduce-electricity-bill-mahadiscom