18 दिवसांचा शोध संपला

दिल्लीच्या सीमेजवळ सुशील कुमारसोबत त्याच्या अन्य दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे.

18 दिवसांचा शोध संपला
Sagar Rana Murder case

18 दिवसांचा शोध संपला

The 18day search is over

दिल्लीच्या सीमेजवळ सुशील कुमारसोबत त्याच्या अन्य दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे.

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये सागर राणाच्या झालेल्या हत्ये प्रकरणी  मुख्य आरोपी, ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमारला  अखेर अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी राजधानीच्या सीमावर्ती भागातून सुशील कुमारला बेड्या ठोकल्या. 

दिल्लीच्या सीमेजवळ सुशीलसोबत त्याच्या अन्य दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. सुशीलविरोधात लूक आऊट नोटीस आणि अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर एक लाखांच्या पारितोषिकाची घोषणा केली होती.

अटकेपासून वाचण्यासाठी सुशील कुमारने कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता, मात्र कोर्टाने तो फेटाळून लावला होता. त्यानंतर दिल्लीच्या मॉडेल टाऊन एसीपींच्या नेतृत्वात दोन पोलीस निरीक्षक आणि डझनभर पोलीस कर्मचारी त्याच्या शोधात पंजाबला गेले होते. अखेर मोबाईल ट्रेस करुन सुशील आणि त्याच्या साथीदारांनी दिल्लीच्या सीमेवरुन ताब्यात घेण्यात आलं.

सुशील कुमारने आपल्या साथीदारांसोबत 4 मे रोजी रात्री पैलवान सागर राणा उर्फ सागर धनखडसह तिघा जणांचं अपहरण केल्याचा आरोप आहे. दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये सुशील आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली, त्यामध्ये 23 वर्षीय सागरचा मृत्यू झाला. सागरचे पिता अशोक धनखड दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल आहेत. सागर छत्रसाल स्टेडियममध्येच राहत होता. तो सुशीलकुमारचा शिष्य होता. प्रशिक्षण काळात सागरने अनेक पदकंही जिंकली.

छत्रसाल स्टेडियमच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये सुशील कुमार सागरला मारहाण करताना दिसत असल्याचा आरोप सागरच्या कुटुंबीयांनी केला होता. त्या दिवशी सागरचे तीन साथीदार सोनू, भगतसिंग आणि अमित यांनाही स्टेडियममध्ये मारहाण करण्यात आली होती. या सर्वांनी आपल्या जबानींमध्ये मुख्य आरोपी म्हणून सुशील कुमार याचेच नाव घेतले आहे.

सुशील कुमार इतर पैलवानांच्या साथीने पूर्ण तयारीनिशी कुस्तीपटू सागर राणाला मारहाण करायला आला होता. पोस्टमार्टम अहवालानुसार सागरच्या छातीखेरीज इतर शरीरावर काठ्या आणि लोखंडी रॉडने वार केल्याच्या जखमा आहेत. त्याच्या शरीरावर 50 हून अधिक जखमा झाल्या आहेत. त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले आहेत.

सुशील कुमार हा भारताकडून दोन वेळा वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारा एकमेव अॅथलीट आहे. 37 वर्षीय सुशील कुमारने 2012 च्या लंडन ऑलिम्पिक्समध्ये रौप्य, तर 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिक्समध्ये कांस्य पदक पटकावलं होतं. 2008 मध्ये सुशील कुमारने जिंकलेलं पदक हे खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिक्समध्ये कुस्ती प्रकारात भारताने पटकवलेलं दुसरं पदक होतं.

त्याला 2009 मध्ये राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च क्रीडा सन्मानाने गौरवण्यात आलं होतं.