"सफाळा पोलीस" व "सर्पमित्र" यांना तांदूळवाडी किल्यावर हरवलेले पर्यटक शोधण्यात यश..!

पालघर जिल्ह्यातील सफाळे (पूर्व) येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या "तांदूळवाडी किल्ल्याला" गिर्यारोहकांची नेहमीच पसंती असते.....

"सफाळा पोलीस" व "सर्पमित्र" यांना तांदूळवाडी किल्यावर हरवलेले पर्यटक शोधण्यात यश..!
Safala police and Sarpamitra succeed in finding lost tourists at Tandulwadi fort
"सफाळा पोलीस" व "सर्पमित्र" यांना तांदूळवाडी किल्यावर हरवलेले पर्यटक शोधण्यात यश..!
"सफाळा पोलीस" व "सर्पमित्र" यांना तांदूळवाडी किल्यावर हरवलेले पर्यटक शोधण्यात यश..!
"सफाळा पोलीस" व "सर्पमित्र" यांना तांदूळवाडी किल्यावर हरवलेले पर्यटक शोधण्यात यश..!

"सफाळा पोलीस" व "सर्पमित्र" यांना तांदूळवाडी किल्यावर हरवलेले पर्यटक शोधण्यात यश..!..

पालघर जिल्ह्यातील सफाळे (पूर्व) येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या "तांदूळवाड किल्ल्याला" गिर्यारोहकांची नेहमीच पसंती असते. मुंबई  पासून १०४ की.मि. तर ठाणे येथून अवघ्या ७५ की.मि.वर असणारा पालघर तालुक्यातील तांदुळवाडी "वनदुर्ग" तरुणाईला कायम आकर्षित करीत असतो. परिणामी, दिवसेंदिवस या किल्ल्यावर येणाऱ्या हौशी व साहसी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

अशातच, मंगळवार दिनांक,२२ सेप्टेंबर २०२० रोजी, वसई येथून आलेले पर्यटक, स्वप्निल जोसेफ डिसूजा वय-३८ वर्ष, ब्लेज पेटिस डिसिल्वा वय-२३वर्ष, यूजीन सचिन कोल्हासो वय-२० वर्ष, यांनी सकाळी तांदुळवाडी किल्यावर चढ़ण्यास सुरुवात केली. दिवसभर किल्यावर भ्रमन्ती करुन आजुबाजुच्या निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आस्वाद घेतल्यानंतर या सर्व तरुणांनी गडावरुन खाली उतरण्यास सुरुवात केली. घनदाट जंगल आणि गर्द झाडीतून खाली उतरण्याची पायवाट चुकल्याने हे तरुण तासभर किल्यावरवरच भरकटत राहिले. परिणामी,अंधार दाटल्याने आणि या भागात बिबटे, हिंस्त्र पशु व श्वापदं , असल्याने या पर्यटकांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता.

दरम्यान, माकुंणसार गावचे "दुर्गमित्र " भूषण म्हात्रे यांच्या कडून सफाळ्याचे "सर्पमित्र" प्रशान्त मानकर (उर्फ) पिंटयादादा यांना सदर प्रकारा बाबतची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ सफाळा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव  यांना संपर्क करुन सदर घटनेची माहीती दिली.

या घटनेची माहिती मिळताच सफाळा पोलीस ठाण्याचे कर्मचारी व सर्पमित्र यांनी हरवलेेल्या पर्यटकांसाठी शोध मोहिम हाती घेतली. आणि रात्रीच्या काळोखात रस्ता भरकटलेल्या पर्यटकांना शोधण्यासाठी सर्वानी किल्ला गाठला. दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर हरवलेल्या पर्यटकांचा शोध लावला आणि प्रयत्नानची पराकाष्ठा करुन त्यांना सुखरूप खाली उतरवले.

सुट्टीच्या दिवशी किल्ल्यावर मोठ्या संखेने पर्यटक येत असतात,विशेषतः गडावरचे नैसर्गिक सौंदर्य पाहून पर्यटकांना वेळेचे भान राहत नाही.आणि पर्यटक रात्र परतीच्या वेळी अंधारात पायवाट चुकुन किल्यावर अडकुन पडतात. आतापर्यंत अशा अनेक घटना घडल्या असून रात्रि-बेरात्री पर्यटकांना शोधण्यासाठी गावातील तरुण व सर्पमित्र नेहमीच आपल्या जीवाची बाजी लावत असतात.

या सर्व "रेस्क्यू ऑपरेशन" मध्ये "सर्पमित्र" कैलाश, भावेश, नीलेश, उमेश, राकेश, ओमी, सुनील, अनिल त्याच बरोबर पोलीस शिपाई सुभाष राठोड, शिवपाल प्रधाने, लालठाने "पोलीस पाटील" संदेश पाटील व चेतन पाटिल यांचे विशेष सहकार्य लाभले. तथापि, सुटकेचा निश्वास सोडलेल्या या पर्यटकांनी आनंद व्यक्त करत "सर्पमित्र रेस्क्यू टीम" व सफाळा पोलीस यांचे मनःपूर्वक आभार मानले.

सफाळा

प्रतिनिधी - रविंद्र घरत

Also see : ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन 

https://www.theganimikava.com/Veteran-actress-Ashalata-Vabagavakar-passes-away