दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान

महाराष्ट्र सरकारनं कोरोन विषाणू संसर्गामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान
SSC Exam news

दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान

The decision to cancel the Class X examination was challenged in the High Court

महाराष्ट्र सरकारनं कोरोन विषाणू संसर्गामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

महाराष्ट्र सरकारनं कोरोन विषाणू संसर्गामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीनं घेतली जाणारी दहावीची परीक्षा रद्द करण्याचा तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला होता.

राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय 20 एप्रिल रोजी घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र सरकारनं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात या विरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे. ही याचिका पुणे येथील प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी दाखल केली आहे. आज या याचिकेवर सुनावणी झाली.

धनंजय कुलकर्णी यांनी राज्य सरकारच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करताना राज्यात दहावीचे अनेक बोर्ड आहेत, त्यापैकी केवळ एसएससी बोर्डाने परीक्षा रद्द केली आहे, असा दावा केला. राज्यातील दहावीच्या इतर बोर्डांचा अजून निर्णय झालेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय रद्द करावा , अशी मागणी याचिकेत केली आहे.

महाराष्ट्र सरकारनं दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय 20 एप्रिलला जाहीर केला होता. तेव्हा सीबीएसई बोर्डानं घेतलेल्या निर्णयाचा अभ्यास करुन निकाल जाहीर करण्याबाबत भूमिका घेऊ, असं म्हटंल होतं. सीबीएसई बोर्डानं दहावीचा निकाल कसा जाहीर करणार याविषयीची नियमावली जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ निकाल कसा जाहीर करणार याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्वनियोजनाप्रमाणं पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 25 एप्रिलला आयोजित केली जाणार होती. मात्र, शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर परीक्षा परिषदेने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शालेय शिक्षण विभागानं 23 मे ही नवीन तारीख निश्चित केली होती. मात्र, कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता आताही परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन केलं जातं. मात्र, कोरोनामुळं परीक्षा पुढे ढकलली होती.राज्यातील 47 हजार 612 शाळांमधील 6 लाख 32 हजार 478 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरला आहे. यामध्ये पाचवीच्या वर्गासाठी 3 लाख 88 हजार 335 तर आठवीच्या वर्गासाठी 2 लाख 44 हजार 143 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

शिष्यवृत्ती परीक्षेची प्रपत्र आणि ऑनलाईन आवेदन भरण्यासाठी यापूर्वी 30 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा   10 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली होती.