स्केटिंग स्पर्धेत मुंबईच्या मुलांचे यश

कर्नाटक येथील दिनांक १३/११/२०२१ ते १४/११/२०२१ रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत (Rural Game Roller Skating National Championship-2021) इतर राज्यांसोबत महाराष्ट्र राज्याचे खेळाडू ही सहभागी झाले होते.

स्केटिंग स्पर्धेत मुंबईच्या मुलांचे यश
Roller Skating National Championship

स्केटिंग स्पर्धेत मुंबईच्या मुलांचे यश

कर्नाटक येथील दिनांक १३/११/२०२१ ते १४/११/२०२१ रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत (Rural Game Roller Skating National Championship-2021)  इतर राज्यांसोबत महाराष्ट्र राज्याचे खेळाडू ही सहभागी  झाले होते.


मुंबई-गणेश हिरवे:

कर्नाटक येथील दिनांक १३/११/२०२१ ते १४/११/२०२१ रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत (Rural Game Roller Skating National Championship-2021)  इतर राज्यांसोबत महाराष्ट्र राज्याचे खेळाडू ही सहभागी  झाले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र संघा तर्फे वांद्रे(पू) मुंबई येथील क्षितिज स्पोर्ट्स क्लब चे कुमार श्रवण संदीप गावडे (U-16 speed quad), कुमार चिरायू शत्रुघ्न गावडे(U-13 speed quad) आणि कुमार कृष्णा संतोष जैस्वाल(U-12 speed inline) हे स्पर्धक सहभागी झाले होते. या तिन्ही खेळाडूंनी स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केली आहे.(Roller Skating National Championship)

सदर स्पर्धेत कुमार श्रवण संदीप गावडे याने U-16 speed quad गटातील 1000m व 500m  या दोन्ही विभागात सुवर्ण पदक पटकावले आणि कुमार चिरायू शत्रुघ्न गावडे याने U-13 speed quad गटातील 1000m व 500m या दोन्ही विभागात कास्यापदक पटकावले. या दोन्ही खेळाडूंची आता आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे. गेली आठ वर्ष वांद्रे पूर्व येथील क्षितिज स्पोर्ट्स क्लब याची वाटचाल प्रशिक्षक निखिल विजय तांबे आणि प्रशिक्षक यश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर सुरू आहे. खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक निखिल सर व यश सर यांना प्रामुख्याने दिले आहे.(Roller Skating National Championship)