'एथिक्स ऑफ रिसर्च रायटिंग अँड पब्लिकेशन' विषयावरील कार्यशाळेला प्रतिसाद
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस तर्फे 'एथिक्स ऑफ रिसर्च रायटिंग अँड पब्लिकेशन इन हेल्थ सायन्सेस' विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती..

'एथिक्स ऑफ रिसर्च रायटिंग अँड पब्लिकेशन' विषयावरील कार्यशाळेला प्रतिसाद
पुणे (pune): महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस तर्फे 'एथिक्स ऑफ रिसर्च रायटिंग अँड पब्लिकेशन इन हेल्थ सायन्सेस' विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.ही कार्यशाळा २४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन पार पडली.डॉ अख्तर परवेझ (हैद्राबाद),डॉ.हारून रशीद कादरी (नासिक),डॉ.अब्दुल समद अझीझ(पुणे) या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
प्राचार्य रमणदीप दुग्गल,डॉ फराह रिझवान,निलोफर खान यांनी स्वागत केले.डॉ इंतेखाब आलम सिद्दीकी,अमीन शेख यांनी तांत्रिक सहकार्य केले.३३८ विद्यार्थी,प्राध्यापक,संशोधक या कार्यशाळेत सहभागी झाले.
पुणे
प्रतिनिधी - अशोक तिडके
________
Also see : जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा