मुख्यमंत्री योगी राजीनामा द्या - मातंग समाजाची मागणी
हाथरस येथील दलीत महिला अत्याचार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने आणि प्रशासनाने पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देऊ शकली नाही.

मुख्यमंत्री योगी राजीनामा द्या - मातंग समाजाची मागणी
पुणे : हाथरस येथील दलीत महिला अत्याचार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने आणि प्रशासनाने पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देऊ शकली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली . हाथरस प्रकरणी देशभर लोक आंदोलन करीत आहेत तरीसुद्धा उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मातंग समाजाच्या विविध संघटनेकडून आज करण्यात आला .व या सरकारचा निषेध म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन येथे तीव्र निदर्शनं करण्यात आली .या वेळी योगी सरकार राजीनामा द्या ,पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे ,बंद करा ,बंद करा दलितांवरील हल्ले बंद करा अशा घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून गेला होता .
या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री ,मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे,राष्ट्रवादीचे नेते सुभाष जगताप, रिपबलिकन मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे ,शिवसेनेचे नेते बाळासाहेब भांडे,अनिल हातागळे ,नगरसेवक अविनाश बागवे ,राष्ट्रवादी सामजिक न्याय शहराध्यक्ष विजय डाकले ,महिला अध्यक्ष सुरेखा खंडागळे ,दलीत महासंघ जिल्हाध्यक्ष आनंद वैराट ,भास्कर नेटके ,रावसाहेब खंडागळे ,या मातंग समाजातील प्रमुख संघटना चे नेते यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले .तर या वेळी पुणे शहरातील विविध पक्ष संघटनाचे कार्यकर्ते ,महिला व युवक मोठ्या संख्यने आंदोलनात सहभागी झाले होते.
पुणे
प्रतिनिधी - अशोक तिडके
_________
Also see : बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने सांगली येथे निषेध आंदोलन
https://www.theganimikava.com/Protest-agitation-at-Sangli-on-behalf-of-Bahujan-Kranti-Morcha