रिपब्लिकन सेनेच्या केज तालुकाध्यक्षपदी बळीराम गायकवाड कार्याध्यक्षपदी रमेश निशिगंध यांची निवड

रिपब्लिकन सेनेच्या केज तालुकाध्यक्षपदी बळीराम गायकवाड कार्याध्यक्षपदी रमेश निशिगंध यांची निवड करून नियुक्तीपत्र दिले....

रिपब्लिकन सेनेच्या केज तालुकाध्यक्षपदी बळीराम गायकवाड कार्याध्यक्षपदी रमेश निशिगंध यांची निवड
Ramesh Nishigandh elected Baliram Gaikwad as Cage Taluka President of Republican Sena

रिपब्लिकन सेनेच्या केज तालुकाध्यक्षपदी बळीराम गायकवाड कार्याध्यक्षपदी रमेश निशिगंध यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश भाऊ शिंदे आणि जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या आदेशा नुसार रिपब्लिकन श्रमिक सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खरात यांनी दिनांक १३ ऑक्टोबर रोजी केज येथील विश्रामगृहावर बैठकीत केज तालुका अध्यक्ष बळीराम गायकवाड आणि कार्याध्यक्ष म्हणून रमेश निशिगंध यांची निवड करून नियुक्तीपत्र दिले. त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी अध्यक्ष चंद्रकांत खरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब गुंड, रमेश निशिगंध, बळीराम गायकवाड, चंद्रशेखर ओव्हाळ, अमोल मस्के, दिलीप कसबे, गणेश मस्के, सचिन शिनगारे, राजू तुपारे अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. निवडी नंतर नूतन तालुकाध्यक्ष बळीराम गायकवाड आणि कार्याध्यक्ष रमेश निशिगंध यांनी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे व चंद्रकांत खरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर तालुक्यात रिपब्लिकन श्रमिक सेनेचे कार्य वाढून त्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची व माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार रुजवण्यासाठी परिश्रम घेणार असल्याचे सांगितले.

दरम्यान जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खरात हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित रिपब्लिकन सेनेचे जिल्हाभर जाळे तयार करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. या बद्दल संस्थापक अध्यक्ष महेश भाऊ शिंदे यांनी देखील चंद्रकांत खरात सर यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत 

__________

Also see : तलवाड्यातिल अवैध धंदे व कर्मचार्यावर आठ दिवसात कार्यवाही करू  उपोशन सुटले….राठोड

https://www.theganimikava.com/I-will-take-action-against-illegal-trades-and-employees-in-Talwada-in-eight-days