राईबाई किनर यांचा अखेर दुर्दैवी निधन 

 प्रशासकीय अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची श्रमजीवी संघटनेची मागणी .....

राईबाई किनर यांचा अखेर दुर्दैवी निधन 
Raibai Kinar finally dies unfortunate
राईबाई किनर यांचा अखेर दुर्दैवी निधन 

राईबाई किनर यांचा अखेर दुर्दैवी निधन 

 प्रशासकीय अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची श्रमजीवी संघटनेची मागणी 

वाडा तालुक्यातील वरसाळे या गावात 32 वर्षीय आदिवासी महिला राईबाई किनर पिण्याचे पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली होती, विहिरीतील पाणी आटून विहीर कोरडी पडलेली, अगदी नाममात्र असलेल्या शिल्लक साठ्यातून पाणी घेत असताना राईबाई तोल जाऊन विहिरीत पडल्या,28 फूट खोल विहिरीत पाषाणावर आदळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्या विहिरीत पडल्याची घटना दिनांक १ ९ मे २०२० रोजी घडलेली. आज त्यांचे उपचाराअभावी घरीच दुर्दैवी निधन झाले. या मृत्यूला जबाबदार असलेले अधिकारी, ठेकेदार आणि उपचार देतो असे सांगून त्यांना झडपोली येथील खाजगी रूग्णालयात दाखल करून घरीं पाठवणार्या जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे यांचायवरही आयपीसी 304-अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेने केली आहे.

राईबाई विहिरीत पडून जखमी झाल्यानंतर त्यांना सायन येथे नेलेले मात्र तिला सायन रूग्णालयात उपचार सुरू असताना कोरोना प्रार्दुभाव सुरू झाल्याने रूग्णालयाने घरी पाठवले , अनुसूचित क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित (राज्यमंत्री दर्जा) यांनी राईबाईच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी  दौरा करून राईबाई यांची भेट घेतली, त्यांना पुढील चांगल्या उपचाराठी मुंबईत दाखल करण्याच्या सूचना दिल्या, त्यांना उपचारासाठी मदत आणि कुटुंबाला आदिवासी विकास विभागाचे अर्थसहाय्य अशी सगळी व्यवस्था केलेली , या सुचनेनंतर लगेचच तहसिलदार वाडा व आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष गावात जावून राईबाई किनर आरोग्य उपचारासाठी मुंबई येथे नेण्याकरीता रूग्णवाहिकेसह भेट दिली , 
मात्र त्यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता प्रदीप भोईर आणि जिजाऊ संस्थेचे काही कार्यकर्ते निलेश सांबरे यांचा निरोप घेऊन आले आणि निलेश सांबरे यांनी राईबाईच्या पूर्ण उपचाराची जबाबदारी स्वीकारली आहे असे सांगत त्यांना जिजाऊ संस्थेच्या झडपोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले, नंतर काही दिवसांनी त्यांना घरी पाठवले आणि आज घरीच त्यांचा मृत्यू झाला.

याच गावात जलयुक्त शिवार योजना सन २०१८-२०१९ यावर्षात नवापाडा येथे पाणी पुरवठा विभागाने विहिरीचे काम केलेले, हे काम अपूर्णच आहे, मात्र निधी हडपून ठेकेदार पसार आहे, परिणामी पाण्यासाठी येथील आदिवासींची वणवण सुरू आहे, राईबाई याच भ्रष्ट व्यवस्थेची बळी ठरली आहे, हे सर्व अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताने दुष्परिणाम आहेत असा आरोप श्रमजीवीने केला आहे, म्हणूनच या योजनेचे ठेकेदार अलिअसगर हसन इंदौरवाला, उपविभागिय अभियंता  वर्ग -१, ग्रामीण पाणीपुरवठा  विभाग वाडा  प्रदिप कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता  प्रमोद भोईर तसेच जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष  निलेश भगवान सांबरे हे सर्व मयत राईबाई रघु किनर यांच्या मृत्यूस जबाबदार आहेत असे सांगत  या सर्वांविरोधात  भा.द.वि.कलम ३०४ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेने वाडा पोलिसांना लेखी निवेदन देऊन केली आहे. 
तातडीने गुन्हा दाखल झाला नाही तर श्रमजीवी संघटना आंदोलन करेल असा इशारा श्रमजीवी संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, वाडा तालुका अध्यक्ष जानू मोहनकर, सचिव मनोज काशीद यांनी दिला आहे.


वाडा

प्रतिनिधी - जयेश घोडविंदे

______

Also see : वाडा नगरपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व

https://www.theganimikava.com/Shiv-Sena-dominates-Wada-Nagar-Panchayat