राहुल गांधी यांना कोरोनाची लागण

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोना संसर्ग झाला आहे. सौम्य लक्षण दिसू लागल्यानं चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

राहुल गांधी यांना कोरोनाची लागण
corona

राहुल गांधी यांना कोरोनाची लागण

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोना संसर्ग झाला आहे. सौम्य लक्षण दिसू लागल्यानं चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोना संसर्ग झाला आहे. सौम्य लक्षण दिसू लागल्यानं चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. दोन दिवसांपूर्वी देशात कोरोना संसर्ग वाढत असल्यान त्यांनी बंगालमधील प्रचारसभा रद्द केल्या होत्या. राहुल गांधी यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे. 

कोरोना विषयक लक्षणं जाणवू लागल्यानंतर कोरोनाची चाचणी केली होती.  कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती राहुल गांधी यांनी दिली. अलीकडच्या काळात जे संपर्कात आले होते, त्यांनी कोरोनासंदर्भातील नियमांचं पालन करावं. कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि सुरक्षित राहावं, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.

कोरोना विषाणू संसर्ग वाढत असल्यानं पश्चिम बंगालमधील राहिलेल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचार करणार नसल्याचं राहुल गांधी यांनी जाहीर केले होते. राहुल गांधी यांनी इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांना सभांबाबत विचार करण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांची आघाडी आहे.


देशात 24 तासात 261500 नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच 1501 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यावर राहुल गांधी यांनी गंभीर चिंता व्यक्त केली होती. अशा प्रकारे मरणाऱ्यांची आणि रुग्णांची संख्या पहिल्यांदाच पाहिली आहे, असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोमवारी समोर आली होती. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे.

नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात मनमोहन सिंग यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.