राहुल गांधींची कॉलर पकडत धक्काबुक्की; पोलिसांनी घेतलं ताब्यात...
पोलिसांनी अडवल्यानंतर प्रियांका गांधी व राहुल गांधी हे पायी चालत हाथरससाठी निघाले असता यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली...

राहुल गांधींची कॉलर पकडत धक्काबुक्की; पोलिसांनी घेतलं ताब्यात...
पुणे पिंपरी : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे आज हाथरसमधील बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी निघाले असता त्यांना पोलिसांनी यमुना एक्सप्रेस हायवेववर अडवले.
पुढे काय घडले? :
पोलिसांनी अडवल्यानंतर प्रियांका गांधी व राहुल गांधी हे पायी चालत हाथरससाठी निघाले असता यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. नंतर पोलिसांनी चालत जाणाऱ्या राहुल गांधींनाही अडवले.
चालत जाणाऱ्या राहुल गांधी यांना अडवत असताना पोलीस व त्यांच्यात झटपट झाली. पोलिसांनी आपल्यावर लाठीचार्ज करत तसेच धक्काबुक्की करत जमिनीवर पाडल्याचेही राहुल गांधींनी म्हटले आहे.
'फक्त मोदीच या देशात चालू शकतात का? सर्वसामान्य व्यक्तीला ही परवानगी नाही का?' अशी विचारणा राहुल गांधींनी केली.
दरम्यान, यानंतर राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सदरील घटनेचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत . एका फोटोमध्ये राहुल गांधींची कॉलरसुद्धा पकडलेले दिसत आहे.
पिंपरी, पुणे
प्रतिनिधी - आत्माराम काळे
_________
Also see : संसद अधिवेशन संपताच खासदार शेतकऱ्यांचा बांधावर
https://www.theganimikava.com/After-the-end-of-the-Parliament-session-the-MP-farmers-on-the-dam