आरएसपी अधिकारी शिक्षक युनिटचे १९३ दिवसांचे कौतुकास्पद कार्य

लॉकडाऊन काळात सलग १९३ दिवस पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून नागरिकांची सेवा करण्याचे कौतुकास्पद कार्य आर.एस.पी.च्या अधिकारी शिक्षक कल्याण डोंबिवली युनिटने केले आहे...

आरएसपी अधिकारी शिक्षक युनिटचे १९३ दिवसांचे कौतुकास्पद कार्य
RSP Officer Teachers Unit's 193 days of commendable work
आरएसपी अधिकारी शिक्षक युनिटचे १९३ दिवसांचे कौतुकास्पद कार्य
आरएसपी अधिकारी शिक्षक युनिटचे १९३ दिवसांचे कौतुकास्पद कार्य

आरएसपी अधिकारी शिक्षक युनिटचे १९३ दिवसांचे कौतुकास्पद कार्य

कल्याण : लॉकडाऊन काळात सलग १९३ दिवस पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून नागरिकांची सेवा करण्याचे कौतुकास्पद कार्य आर.एस.पी.च्या अधिकारी शिक्षक कल्याण डोंबिवली युनिटने केले आहे.

 २१ मार्च पहिल्या लॉकडाऊन पासून ते ३० सप्टेंबर पर्यंत कल्याण डोंबिवली आरएसपी अधिकारी शिक्षक युनिटचे कमांडर मनिलाल शिंपी यांनी महाराष्ट्राचे महासमादेशक अरविंद देशमुख, पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी, जनजागृती, समाजामध्ये कोरोना सारख्या आपत्कालीन परिस्थितीत सोशल डिस्टंसिंग, मास्क लावणे, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा अशाप्रकारे समुपदेशन करित होते.

 हे सर्व करताना संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले असताना रोजगाराच्या समस्या निर्माण झाल्या व उपासमारीची वेळ समाजातील विविध घटकांना आली. हे पाहून आरएसपी अधिकारी शिक्षक कल्याण डोंबिवली युनिटच्या वतीने परिसरातील विविध संस्था, समाजसेवक व दानशुर लोकांच्या सहकार्याने कल्याण डोंबिवली, टिटवाळा, भिवंडी, आंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, परिसरातील गरजूंना मदत म्हणून अन्नधान्याचे किट तयार करून ६ हजार कुटुंबियांना वाटण्यात आले. खाजगी शाळेतील शिक्षकांना या परिस्थितीत पगार बंद केले.  त्यामुळे अशा शिक्षकांना कल्याण तालुका क्रिडा संघर्ष समिती, स्पोर्टस हेल्पर फौंडेशन यांच्या सहकार्याने चार महिने रेशन वाटप करण्यात आले.

समाजसेवा करण्यासाठी आर एस पी अधिकारी शिक्षक युनिटला जेसस इज लाईफ फाउंडेशन उल्हासनगर, लिओ क्लब, कल्याण सामाजिक संस्था, सी एन पाटील फाऊंडेशन, माहेर वस्ती स्टार महिला अध्यक्षा रेखा जाधव, आय ई एस टीचरस, सुधीर दिनकर, गिरीष अग्रवाल, कमलेश पटेल, अमित कुकरेजा, समाजसेवक सुरेश धडके आदी समाजसेवी संस्थांनी एकत्र येऊन अन्नदानाचे कार्ये केले. तसेच रोज ३०० कामगारांना दुपारचे जेवण देण्याचे कार्य अजूनही सुरू आहे.

हे सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी आरएसपी अधिकारी शिक्षक कल्याण डोंबिवली ठाणे जिल्हा उप कमांडर मनिलाल शिंपी यांच्या नेतृत्वाखाली आरएसपी अधिकारी शिक्षक युनिटचे अनिल बोरनारे, बापू शिंपी, महादेव क्षीरसागर, अनंत कीनगे, बन्सीलाल महाजन, केशव मालुंजकर, रामदास भोकनळ, सचिन मालपुरे, दत्तात्रय पाटील, कैलास पाटील, राजेंद्र गोसावी, भारती जाधव, जितेंद्र सोनवणे,  नितिन पाटील,रितेश पाटील, दिलीप पावरा, भानुदास शिंदे, योगेश अहिरे  आदींचे मोलाचे  योगदान आहे.

कल्याण, ठाणे

 प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________

Also see : विरोधक कुठे आहेत ? विरोधक तर बिहार मध्ये आहेत! महाराष्ट्राच्या संकटाच्या काळात शरद पवार धावून येतात–धनंजय मुंडे

https://www.theganimikava.com/Where-are-the-opponents-are-in-Bihar-Sharad-Pawar-comes-running-in-times-of-crisis-in-Maharashtra-Dhananjay-Munde